व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्त सोमवारी शहरातील मांसविक्री बंद-नगराध्यक्ष जिया बेग

आष्टी नगर पंचायतचा निर्णय

0

click2ashti update-अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.यामुळे संपर्ण देशभरातील वातावरण राममय झाले आहे.देशभरातील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच दरम्यान आता आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आष्टी शहरातील मांस विक्रेत्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे आष्टीतील मटण आणि चिकनची दुकाने बंद ठेवण्यात येणार असून 22 जानेवारी रोजी आष्टीत मांसविक्री होणार नाही.राम मंदिरातील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात आनंदाचे,उत्साहाचे वातावरण आहे.हेच पाहता आष्टीतील दि. 22 जानेवारी रोजी मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आष्टी नगर पंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.