महिला सक्षमीकरणासाठी लघु उद्योगाच्या माध्यमातू महिलांना संधी निर्माण करून देणार-आ.बाळासाहेब आजबे
आष्टी तालुक्यातील दौलावडगांव येथे कार्यक्रम संपन्न
click2ashti update-ग्रामीण भागामध्ये उत्पादनाची साधने कमी असल्याने महिलांना रोजगार मिळणे व स्वतःच्या पायावर उभा राहणे कठीण जाते.त्यासाठी गावागावात प्रमुख लोकांनी एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग सुरू करून देण्यासाठी पुढे यावे. महिला सक्षमीकरणासाठी गावागावात प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते दौलवडगाव येथे रणरागिणी महिला सक्षमीकरण व लघुउद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बाबासाहेब पिसोरे,ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे,जगन्नाथ ढोबळे,हरिभाऊ दहातोंडे,परसराम मराठे,महादेव डोके,शिवाजी शेकडे,शामराव फसले,सरपंच भरत जाधव,रावसाहेब दळवी,नंदू फसले,आजिनाथ फसले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना आमदार आजबे म्हणाले,महिला सक्षम झाल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही.त्यासाठी महिलांनी फक्त शेतातील कामे न करता इतर छोटे मोठे घरगुती व्यवसाय सुरू केले पाहिजेत.महिला बचत गटातील सदस्यांनी एकत्र येऊन छोटे-मोठे प्रशिक्षण घेऊन गावातच वेगवेगळे उद्योग कसे सुरु होतील यासाठी प्रयत्न करून गावातील सरपंच यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी मदत करणे गरजेचे आहे.हे सर्व करत असताना महिलांना प्रोत्साहन व संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी कृषिरत्न बाबासाहेब पिसोरे,सरपंच भरत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सरपंच भरत जाधव म्हणाले,आपण गावामध्ये छोटे-मोठे व्यवसायासाठी यंत्रसामुग्री व जागा उपलब्ध करून देऊन गावातच छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य देणार आहोत.व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या माध्यमातून गावांमध्ये अनेक विकास कामे झाली.वेळोवेळी त्यांची मदत मिळाल्यामुळेच आज गावामध्ये विकास कामे दिसत आहेत असेही सरपंच भरत जाधव यांनी सांगितले.यावेळी नंदू फसले,बाळासाहेब कोहक,अजिनाथ फसले, शामराव फसले बशीर मामू बाजीराव अडबले नवनाथ इथापे मीरा मामू प्रवीण जाधव,प्रदीप बांगर,चेतन पाटोळे काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.