विद्यार्थ्याला विष पाजणारे अध्यापही मोकाट,बीड,नगर एसपींना नोटीस आष्टी येथील प्रकरण
३० जानेवारीला सुनावणी
click2ashti update-येथील पंडित जवाहरलाल नेहरू अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी धनराज शिवाजी चखाले याला,वर्गात बेंचवर बसण्याच्या कारणावरून चार महिन्यांपूर्वी सहा जणांनी कीटकनाशक पाजले होते.याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नसल्याने, विद्यार्थ्यांच्या पित्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली.त्यामुळे खंडपीठाने बीड व नगर येथील पोलिस अधीक्षकांसह आष्टी आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना नोटीस बजावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,आष्टी येथील नेहरू अध्यापक महाविद्यालयाचा, डी.एड. प्रथम वर्षाचा विद्यार्थी धनराज शिवाजी चखाले, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयात आला. वर्गात त्याला कीटकनाशक पाजल्याने तो बेशुद्ध झाला होता. त्याला नगरच्या सामान्य रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले होते.दरम्यान १३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान तो बेशुद्ध होता. २५ ऑक्टोबरला तो शुद्धीवर आला.त्यानंतर त्याच्या तक्रारीवरून अजय गरूड व अविष्कार जगताप या दोघांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.परंतु पोलिसांनी काहिच कारवाई केली नव्हती
मुलासह वडिलांची खंडपीठात याचिकाभ्
या प्रकाराबाबत संबंधितांवर कोणतीच कारवाई केली नाही. विद्यार्थ्यांच्या जबाबानुसार बीड पोलीस अधीक्षक कार्यालय व आष्टी येथील पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले होते.विद्यार्थ्यांचे वडील शिवाजी चखाले व धनराज चखाले यांनी अॅड. फारूकी कमालोद्दीन नुरोद्दीन यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करून,पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.