सरकार झुकले;मराठा जिंकले..! मनोज जरांगेचे अंदोलन मागे;मुख्यमंञी वाशीत दाखल
हा मराठा समाजाच्या एकीचा विजय-जरांगे पाटील
click2ashti update-मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारला अल्टिमेटम देणारे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मागण्यांबाबत अधिसूचना काढण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. त्याचवेळी आता मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे.आमचा विरोध आता संपला आहे.त्यांनी आमची विनंती मान्य केली आहे.त्याचे पत्र आम्ही स्वीकारू आणि आज (शनिवारी) मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिणार असल्याचे जरांगे यांनी सांगीतले.
याआधी काल मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता.ते म्हणाले 11 वाजेपर्यंत आरक्षणाचा अध्यादेश जारी करा,अन्यथा 12 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून आंदोलन सुरू करू,पण रात्रीतून मोठ्या घडामोडी झाल्या आणि सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याला अपेक्षित सर्व गोष्टी सरकारने मान्य केल्या आहेत. आपण उद्या सर्व जण गुलाल उधळून आपण गावी वापस जाणार आहोत, असे सांगतानाच आम्ही विजयी सभा घेणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.