पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं असतात त्याचा आम्हाला अभिमान-राष्ट्रवादीचे माजी आ.राजन पाटील यांचे वादग्रस्त विधान
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आली रंगात
सोलापूर वृत्तसेवा-पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच
तुझ्याएवढी एवढी पोरं असतात.त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे.आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302,307 ची कलमं लागली आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे,असे वादग्रस्त वक्तव्य मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना केले आहे.त्यामुळे त्यांच्यावर टीकेची एकच झोड उडतेय.
पाटील यांच्या वक्तव्याने शिवरायांच्या महाराष्ट्रातील समस्त महिलांचा अपमान झाल्याची टीका धनंजय महाडिक यांनी केलीय.तर पाटील यांच्यावर कलम 354 खाली गुन्हा नोंदवा,अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलीय.
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या रंगात आलीय.त्यात खासदार महाडिक यांनी राजन पाटील यांच्या मुलांवर टीका केली होती.’बाळांनो असे बोलू नका,’असा चिमटा काढला होता.या टीकेला उत्तर देताना पाटील भलतेच बोलून बसले.ते म्हणाले की, ‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय,अरे आम्ही पाटील आहोत.पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात.त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत,याचा आम्हाला अभिमान आहे असे भलतेच विधान केल्याने सर्वञ पाटील यांच्यावर टिकेची झोड उडत आहे.
माजी आ.राजन पाटीलवर गुन्हा दाखल करा-चिञा वाघ
—————————————————————
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, राजन पाटील यांचे वक्तव्य अतिशय संतापजनक, निषेधार्ह आहे. ही त्यांची भूमिका आहे, त्यांच्या पक्षाची आहे की आणखी कोणाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने महाराष्ट्रातील सर्व महिलांची खिल्ली उडवली आहे. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील महिलांचा विनयभंग झाला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर 354 चा गुन्हा तात्काळ दाखल करावा. आता महाराष्ट्रातल्या रणरागिणी बद्दल त्यांना महाराष्ट्रात फिरू देतील का, त्यांच्या फोटोवर चपला मारून आंदोलन करणार का, असा सवाल ही त्यांनी केला.
पाटील म्हणायची लाज वाटते
——————————————
राजन पाटील यांच्या या वक्तव्यावर उमेश पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे.आता आम्हाला पाटील म्हणून घ्यायला लाज वाटते. हा घाणरेडा नेता मोहोळ तालुक्याचा तीन वेळा आमदार झाला.याचीही आम्हाला लाज वाटते.त्यांनी समस्त महिलांचा अपमान केला आहे. असा विकृत माणूस तुम्हाला कारखान्याचा नेता म्हणून चालेल का,असा सवालही त्यांनी केला.
महिलांचा केला अपमान
———————————
पाटील यांच्या टीकेला खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार उत्तर देत हा शिवरायांच्या राज्यातील समस्त महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. महाडिक म्हणाले, पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. राज्यातल्या सगळ्या पाटलांनी त्यांचा निषेध करावा. त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या मुला-मुलींच्या सारुवाडीच्या पाहुण्यांना काय वाटत असेल. मुली दिलेल्या बापाला झोप लागली असेल का? सुनांना काय वाटले असेल? असा तिखट सवालही त्यांनी केलाय.