“श्रीरामा”च्या दर्शनाला आयोध्येत आई-वडिलांना घेऊन जाणारा श्रावणबाळ
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील माजी सैनिक भरत पोकळे यांचे सर्वञ कौतुक
click2ashti update-सध्याच्या युगात आई-वडिलांचा मनाचा विचार करणारी बोटांवर मोजण्या इतकीच लोकं आहेत.दि.२२ जानेवारीला सोमवारी आयोध्येत श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यानंतर दुस-या दिवशी दि.२३ पासून सर्वसामान्यांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आले.यामध्ये आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील माजी सैनिक भरत सुखदेव पोकळे यांनी आपल्या वृध्द आई-वडिलांना विमानाने घेऊन जाऊन श्रीरामाचे दर्शन घडवून आणले आहे.
आयोध्येत श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी सा-या देशात दिवाळी साजरी करण्यात आली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर चक्क नऊ दिवस फक्त नारळपाणीचे उपवास केले.दि.२२ जानेवारी रोजी आयोध्येत श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अन् दि.२३ जानेवारी पासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी दर्शन घेण्यास खुले करण्यात येताच आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील देशसेवा केलेले माजी सैनिक भरत पोकळे यांनी आपले वृध्द वडील सुखदेव बाप्पु पोकळे, आई भिमाबाई सुखदेव पोकळे,पत्नी कविता भरत पोकळे,मुलगी वैष्णवी भरत पोकळे यासर्वांना विमानाने घेऊन जाऊन श्रीरामाचे दर्शन घडवून आणले.या दर्शनाने श्रीरामाच्या दर्शनासाठी आयोध्येत घेऊन जाणारा अधुनिक श्रावण बाळच म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.