स्पाॅ-सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय;पोलिसांचा छापा दोन तरूणींची सुटका
click2ashti update-पुणे शहरात बाणेर परिसरात एका स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तरूणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली असून, मसाज पार्लरचालक महिलेला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सिमरन उर्फ वैष्णवी दीपक पवार (वय ३७), गुलाबदाम महाजन या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमरन पवार हिला अटक करण्यात आली असून याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. बाणेर परिसरात रॉयल स्पा नावाच्या पार्लरमध्ये छुपा वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अचानक सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी दोन तरुणींना ताब्यात घेत त्यांची सुटका केली. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव,सहायक निरीक्षक अनिकेत पोटे,राजेश माळगावे आणि पथकाने ही कारवाई केली.