व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आमदार धसांचा पुन्हा “पठाडे”यांच्यावर विश्वास;विवेकानंद पदाधिकारी यांच्या निवडी जाहिर

अध्यक्षपदी मारुती पठाडे उपाध्यक्षपदी अशोक लटपटे तर सचिवपदी महेश शिंदे यांची बिनविरोध निवड

0

click2ashti update-कडा तालुका आष्टी येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत आमदार धस यांचे पुन्हा एकदा निर्वाद वर्चस्व सिध्द झाले.या निवडणूकीत एकास एक उमेदवार रिंगणात होते.त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार असे वाटले पण आमदार सुरेश धस यांनी आपली जादूची कांडी फिरवत पुन्हा हि संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.पण मागील पाच वर्षात अध्यक्ष मारूती पठाडे यांच्या एकहाती कारभारामुळे शिक्षक मतदारात नाराजीचा सुरू होता.पण आमदार धस हेच उमेदवार समजून शिक्षक मतदारांनी संस्था पुन्हा ताब्यात दिली.पण आमदार धस यांनी पुन्हा मारूती पठाडे यांच्यावर विश्वास दाखवत अध्यक्षपदी मारुती पंढरीनाथ पठाडे,उपाध्यक्षपदी अशोक लटपटे तर मानद सचिव पदी महेशकुमार शिंदे यांची अविरोध निवडीचे इदेश दिल्याने शिक्षक सभासदांमध्ये काहि खुशी काहि गम असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.


स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचा वटवृक्ष तब्बल पन्नास वर्षाचा झाला असून या संस्थेचा आर्थिक कारभार जवळपास पारदर्शक असल्याने निवडणुकीमध्ये शिक्षक सभासदांनी मोठ्या मनाने व विश्वासाने आमदार धस यांच्या गटाकडे हि संस्था पुन्हा ताब्यात दिली आहे.विद्यमान अध्यक्ष मारूती पठाडे यांनी गेल्या पाच वर्षात एकहाती कारभार चालविला पण आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेतल्याने त्यांना या निवडणूकीत क्रमांक एकची मते मिळाल्याने पतसंस्थेचे मार्गदर्शक आमदार सुरेश धस यांनी सलग दुसऱ्यांदा मारुती पठाडे यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष मारुती पठाडे तर उपाध्यक्ष म्हणून अशोक लटपटे तर मानद सचिव म्हणून महेश कुमार शिंदे यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब राऊत यांनी जाहीर केली.यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश पवार,शिक्षण विस्ताराधिकारी मनोरंजन धस,शिक्षक नेते बा.म.पवार,श्रीमंत सोनवणे,विलास वायभासे,जगन्नाथ सोनवणे,जगन्नाथ भगत,शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप खराडे,अपंग कर्मचारी संघटनेचे राजेंद्र लाड, अशोक उडाणे, संतोष पोकळे , बाबासाहेब मुटके,उद्धव सोनवणे आधी शिक्षक सभासद उपस्थित होते. अध्यक्ष उपाध्यक्ष व मानव सचिव निवड अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली दरम्यान विरोधी गटाचे संचालक स्वानंद थोरवे व रत्नाकर चव्हाण यांनीही आपले अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी फॉर्म भरले होते.परंतु त्यांना अनुमोदक न मिळाल्यामुळे त्यांचे निवड प्रक्रियेतील फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद केले.व मारुती पठाडे अध्यक्ष अशोक लटपटे उपाध्यक्ष व महेश कुमार शिंदे मानस सचिव यांची निवड झाल्याची घोषणा केली.स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती पठाडे उपाध्यक्षपदी अशोक लटपटे तर मानद सचिव पदी महेश शिंदे यांची अविरोध निवड झाल्याबद्दल संचालक सर्वश्री शिंदे विठ्ठल,पोकळे हिरामण,काळे संजय,काळे आप्पासाहेब,खाडे चंद्रशेखर,मेहेरकर प्रवीण,करडूळे नितीन,गर्जे आदिनाथ,बोराडे पोपट,गोरे गोरक्ष,श्रीमती मनीषा होळकर,श्रीमती शैला सातपुते,कार्यालयीन व्यवस्थापक ज्योतीराम देसाई कॉम्प्युटर ऑपरेटर वैजनाथ रायते माऊली जाधव यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक व सभासद बंधू भगिनी स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित कडा,यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.