मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला;मंञी नारायण राणे यांचा हल्ला
आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत
click2ashti update-मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील याच्यावर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते काहीही बडबड करत असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.इतकेच नाही तर मनोज जरांगे यांनी आता मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील 5 दिवसांत त्यांनी अन्न,पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे.अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते,बोलण्यास देखील त्रास होत आहे.त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
नेमके काय म्हणाले नारायण राणे
या संदर्भात नारायण राणे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. या मध्ये त्यांनी म्हटले की, ‘मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननी नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. अशी बेताल बडबड त्याने केली.त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव!तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल.आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.