व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जुन्या वादातून बारावीच्या मुलाने नगरसेवकावर बंदूक रोखून ट्रिगर दाबले;पण गोळी अडकल्याने वाचला जीव !

अहनगर जिल्ह्यातील पारनेर येथील घटना

0

click2ashti update-पारनेर नगर पंचायतीचे नगरसेवक पहिलवान युवराज पठारे यांच्या छातीवर पिस्तूल ठेवून गोळीबार करण्याचा प्रयत्न गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला.हल्लेखोराने झाडलेली गोळी पिस्तुलात अडकल्याने पुढील अनर्थ टळला.पारनेर बसस्थानकासमोरील दिग्विजय हॉटेलसमोर हा प्रकार घडला.तेथे उपस्थित असलेल्या पठारे यांच्या मित्रांनी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पकडले.जमावाने हल्लेखोराला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान,महाविद्यालयीन तरुणांच्या जुन्या वादाच्या रागातून हल्लेखोराने पठारे यांच्यावर हल्ला केला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.हल्लेखोर पारनेर महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत आहे.तो अल्पवयीन असल्याचा दावा करीत आहे,पोलिस हल्लेखोराच्या पडताळणी करीत आहेत.
हल्लेखोराकडे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या प्रकरणात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी पोलिसांनी हल्लेखोरासह एकूण तीन आरोपीना ताब्यात घेतले,तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पाच पैकी तीन आरोपी पारनेर शहरातील आहेत. एक आरोपी तालुक्यातील रांजणगाव मशीद तर एक आरोपी देवीभोयरे फाटा येथील आहे. चौकशीत हल्लेखोराकडून विसंगत माहिती मिळत असल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.पठारे नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता त्यांच्या खरेदी विक्री संघाच्या आवारात असलेल्या यश हटिलसमोर मित्रांसमवेत बरस्ले होते कड़ी वेळाने ते शेजारी असलेल्या दिग्विजय हटिलमध्ये वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर यांना भेटप्प्यासाठी गेले. त्यानंतर काही खेळातच हल्लेखोर पठारे यांच्या यश हॉटेलमध्ये आला तेथे पठारे नसल्याने तो बाहेर आला.पठारे त्याला दिग्विजय हॉटिलसमोर मित्रांसमवेत उभे असल्याचे दिसले.त्याने पठारे यांच्या जवळ जात त्यांच्या छातीवर पिस्तूल ठेवून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.मात्र गोळी पिस्तूलाच्या चेबरमध्ये अडकली असावी.त्यामुळे गोळी उडाली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
माजी सरपंचाने हातावर फटका मारल्यामुळे पिस्तूल खाली पडले
पठारे यांचे मित्र गटेवाडीचे माजी सरपंच भरत गट यांनी हल्लेखोरांच्या हातावर फटका मारताच पिस्तूल खाली पडले. तेथे उपस्थित जमावाने हल्लेखोराला बेदम मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून हल्लेखोराची सुटका करत ताब्यात घेतले. पठारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी काही आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा करीत असल्याने तसेच गोपनीयतेच्या मुद्द्यावरून पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.