मराठे आंदोलककर्ते आक्रमक;आमदार धस,आमदार आजबे यांच्या घरासमोर आंदोलन..!
आ.सुरेश धस यांनी आश्वासित केल्याने समाधान
click2ashti update-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन पुकारले त्यानंतर सरकारनेही आरक्षणासाठी अजूनही विशेष अधिवेशन घेण्यात आले नसून,सगे सोयरे बाबत कोणताही तोडगा काढला नाही.त्यामुळे आता त्यांची तब्बेत खालवली आहे.त्यामुळे आता राज्यभरातील मराठे आंदोलककर्ते आक्रमक झाले आहेत.आज दि.16 रोजी दुपारी दोन वाजता विधानसभा सदस्य आ.बाळासाहेब आजबे व विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानासमोर सरकार विरोधात निदर्शन करत मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करावे यासाठी विधानभवनात आवाज उठविण्याची मागणी अंदोलनकर्ते यांनी केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण चालू केले.आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असूनही सरकारने अजूनही आध्यादेश काढला नाही.त्यामुळे आज शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 2 च्या सुमारास मराठा समाजातील अंदोलनकर्त्यांनी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी येथील तर विधानसभा सदस्य आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ येथील घरांसमोर “एक मराठा..लाख मराठा”,सपोट करा..सपोट करा..मनोज जरांगे यांना सपोट करा…!,आरक्षण आमच्या हक्काचे..नाही कुणाच्या बापाचे..!,या घोषणासह आपण विधानसभा अधिवेशनात आपण आरक्षणाबाबत चर्चा करून आरक्षण मिळविण्यासाठी आवाज उठवावा अशी मागणी या अंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आ.सुरेश धस यांनी आश्वासित केल्याने समाधान..
समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडे निश्चितपणे आपल्या भावना कळविण्यात येतील. आणि मला विश्वास आहे की शिंदे,फडणवीस,पवार यांच सरकार समाजाला निश्चितपणे येणाऱ्या अधिवेशनात आरक्षण देईल असा विश्वास व्यक्त केला.आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे मी इथून मागे देखील आरक्षणाच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहणार.असे सांगितल्यावर आंदोलकांनी आ.धस यांच्या भूमिकेचे स्वागत करत समाधान व्यक्त केलं.