मराठा आंदोलकांनी आमदाराची फोडली गाडी;आमदार सुरक्षित
नांदेड जिल्ह्यातील पुंड पिंपळगावामधील घटना
click2ashti update-नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डेची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली मराठा नेते मनोज जरांगे यांचा समर्थानात ठिक ठिकाणी नांदेड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर आज रात्री साडेदहाच्या सुमारास नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली पिंपळगाव निमजी इथली ही घटना आहे, आमदार हंबर्डेयांच्या सह अंगरक्षक आणि चालकाला कुठली इजा झाली नाही.
पुंड पिंपळगाव येथे शुक्रवारी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे हे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गावात गेले होते. गावात प्रवेश करताच मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांचा विरोध केला.घटनेनंतर गावात काही काळ तणावाच वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर आंदोलककांशी चर्चा करण्यासाठी आमदार मोहन हंबर्डे हे वाहनातून बाहेर आले.काही वेळातच आंदोलकांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित असल्याची माहिती आहे. दरम्यान,काही महिन्यापूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती.