युवा नेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नागरीकांनी लाभ घ्यावा
click2ashti update-जामगावचे सरपंच तथा युवा नेतृत्व राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रक्तदान शिबिर, महिलांसाठी हळदी कुंकू,होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा तसेच मोफत दंत व त्वचारोग तपासणी शिबिर,पोखरी येथे महाआरोग्य तपासणी शिबीर,शेकापूर येथील गो शाळेला दोन दिवस पुरेल एवढा चारा अशा विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राधेश्याम धस मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील जामगावचे सरपंच तथा युवा नेतृत्व राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यंदाही बुधवार दि.21 फेब्रुवारी बुधवार रोजी आष्टी शहरातील पंचायत समिती प्रांगणात भव्य रक्तदान शिबिर सकाळी 9 ते 2 या वेळेत आयोजित केले आहे.तर याच वेळी डॉ.प्रणित जावळे व नेहा जावळे यांच्या वतीने मोफत दंत व त्वचारोग तपासणी शिबिर आष्टी मुर्शदपुर येथील डॉ.जावळे डेंटल हेअर क्लिनिक,गीते कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आले आहे. शेकापूर येथील गोशाळेला दोन दिवसाचा चारा देण्यात येणार आहे. पोखरी येथे उपसरपंच दीपक घुले यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी 5 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाबरोबरच प्रसिद्ध सिने अभिनेते निलेश पापत यांचा हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिला भगिनींसाठी भेटवस्तूचे वाटप करण्यात येणार असून आष्टी पंचायत समिती प्रांगणात होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन राधेश्याम धस मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.