लोकसभेत बीडचा भाजपाचा उमेदवार कुणीही असो आपण कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करून देशाला पुन्हा एकदा मजबूत नेतृत्व द्यावे-पंकजा मुंडे
आमदार सुरेश धसांचे काम राज्यात नंबर एक
click2ashti update-आष्टी(प्रतिनिधी)-स्त्री मुख्य पदावर असण्याचा समाजाला फायदा असतो.आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो.मनुष्य योनीत जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला संघर्षाला सामोरे जावे लागते.मात्र आता चांगल्या व्यक्तीला,चांगल्या विचारांना खतपाणी देणे ही काळाची गरज असून,येणा-या लोकसभेत बीडचा भाजपाचा उमेदवार कुणीही असो आपण कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करून देशाला पुन्हा एकदा मजबूत नेतृत्व द्यावे असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात गुरूवार दि.२२ रोजी दुपारी ५ वा.आयोजित करण्यात आलेल्या आष्टी विधानसभा मतदान संघाच्या गण प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख,बुथ वाॅरीअर्स,विस्तारक,प्रवासी तसेच प्रमुख कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करतांना मुंडे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर आ.सुरेश धस,माजी जि.प.अध्यक्ष सय्यद आब्दुला,माजी जि.प.अध्यक्ष सविता गोल्हार,महेंद्र गर्जे,आष्टी नगराध्यक्ष जिया बेग,पाटोदा नगरध्यक्ष राजू जाधव,कृषी उत्पन्न बाजार समिती कडा सभापती रमजान तांबोळी,पाटोदा बाजार समिती सभापती किरण शिंदे,डाॅ.शैलाजा गर्जे,आष्टी, पाटोदा,शिरूरचे भाजपा तालुकाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या,आष्टी विधानसभा मतदार संघाचे काम महाराष्ट्रात नंबर एक असून,सरळ अॅपमध्ये ५१ हजार सदस्यांची नोंदणी आ.धस यांनी करून घेतली असल्याचे त्यांनी सांगीतले.असेच आमदार धस यांनी एक नंबर काम येणा-या लोकसभा अन् विधानसभेत काम करून नंबर एक राहवे सध्या राज्यात बीड आणि बारामती या दोन जिल्ह्यांकडे पाहूण राजकारणांचा अंदाज लावला जात आहे.तसेच”माझे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत.ते केवळ मुंडे साहेबाचा फोटो आणि पंकजा ताईंचा चेहरा बघतात.कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण होते तेव्हा प्रत्येक पाकळी माझ्यावर जबाबदारीचे ओझे घेऊन येत असते.या गोष्टीचा मला अहंकार नाही.संघर्षाला सोन्याची किनार कार्यकर्ते देतात”,असे पंकजा कार्यकर्त्यांना म्हणाल्या.यावेळी आ.धस म्हणाले,आम्ही पक्षाने दिलेली जबाबदारी पुर्णपणे पार पाडत असून,दिवार लेखन सुध्दा संपूर्ण मतदार संघातील ४४१ बुथ केंद्रांवर आम्ही केले आहेत.तसेच पार्टी जो आदेश देत आहोत तो आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करीत आहोत.पुन्हा गावचलो अभियान हे ४४१ बुथ केंद्र दोन दिवसात आम्ही पुर्ण केले आहेत.आणि सर्व कामे पुर्ण झाल्यावर सरळ अॅपवर डाऊनलोड करण्याचे सांगीतले त्या प्रमाणे हे सर्व कामे आम्ही आपलोड केले असल्याचेही आ.धस यांनी सांगीतले.
भारतीय जनता पार्टीचे पद शोभेसाठी नाही-आ.धस
भारतीय जनता पार्टीने थेट तळा-गाळातील सर्वसामांन्य नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्याच्या कामे प्रत्येक कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी काम करण्याचे सांगीतले आहे.भाजपाच्या प्रत्येक पद हे शोभेसाठी नसून कामे करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचेही आ.धस यांनी सांगीतले.
कोणत्याच पालकमंञ्यांनी एवढे कामे केले नाहीत
आज पर्यंत बीड जिल्ह्याला अनेक पालकमंञी मिळाले पण आजपर्यंत पंकजा मुंडे यांनी आपल्या पालकमंञी पदाच्या काळात छोट-छोट्या गावात कामांसाठी निधी मोठ्या प्रमाणावर दिला असून,आत्तापर्यत कोणत्याच पालकमंञी यांनी दिला नाही अन् देणार ही नाही एवढा भरभरून निधी पंकजा मुंडे यांनी दिला असल्याचेही आ.धस यांनी सांगितले.