जिल्हावासियांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा आनंदच;पण कामात गती नसल्याचेही दुख-खा.प्रितम मुंडे
आता दररोज धावणार अहमदनगर-अंमळनेर रेल्वे
click2ashti update-एक-एक पल्ला गाठत ही रेल्वे पुर्ण होत आहे.लवकरच बीड जिल्हावासियांचे लवकरच पुर्ण होऊन,देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी बीड जिल्ह्यासाठी रेल्वेला भरभरून निधी देत असल्याने लवकरात-लवकर अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्ण होणार असून,जिल्हावासिय हे मुंबई पर्यंत यामधून प्रवास करतील असा शब्द जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांनी केला.
महाराष्ट्रातील रेल्वेचा पायाभूत सुविधांचा विस्तार करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथून आज बुधवार दि.२८ रोजी दुपारी ५ वा.अंमळनेर(भां) ते न्यू आष्टी रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी बीड खासदार डाॅ.प्रितम मुंडे,बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ/मुंडे,सोलापूर मंडळचे डिएमआर निरजकुमार दोहारे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के,अमळनेर सरपंच लिलाबाई श्रीपती गाडे,युवानेते जयदत्त धस,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सविता गोल्हार,माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे,बीड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष सलिम जहाॅगिर,रामकृष्ण बांगर,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ.लक्ष्मण जाधव,रामदास बडे,पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा लांबरूड,सोलापूर मंडळ सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम,यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी खा.मुंडे बोलत होत्या.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या,खा.प्रितम मुंडे म्हणाल्या,या रेल्वेच्या कार्यक्रमाने थोडा आनंद आणि थोडे दुख;पण आहे.टप्या-टप्याने ह्या रेल्वेचे काम झाले त्याचा आनंद आहे पण उशीरा होते याचे दुख्:आहे.सध्या हि रेल्वे अंमळनेर पासून ती पुण्याला ती ट्रेन गेली पाहिजे अशी मागणी ही खा.मुंडे यांनी केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सैलापूर मंडळ विभागाचे निरजकुमार डोहारे म्हणाले,लवकरात-लवकर बीड पर्यंत रेल्वेचे काम पुर्ण होणार असून,आत्ता आमळनेर ते न्यू आष्टी या ३२ कि.मी.रेल्वे सेवा सुरूळीत झाली असून,ह्या ठिकाणाहून दररोज अमंळनेर (भा) ते अहमदनगर रेल्वे जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
असे असेल सोमवार ते शनिवार रेल्वेचे वेळापञक
अहमदनगर-अंमळनेर, अहमदनगर हून सकाळी 7.45 वा.ला सुटणार आणि नारायणडोहो आगमन 8.45 वा. प्रस्थान 8.47 वा. लोणी आगमन 9.03 वा. प्रस्थान 9.05 वा. सोलापूरवाडी आगमन 9.30 प्रस्थान 9.32, न्यू धानोरा आगमन 9.48 प्रस्थान 9.50 वा.कडा आगमन 10.00 वा. प्रस्थान 10.02 वा.आणि न्यू आष्टी आगमन 10.28 वा.प्रस्थान 10.30 वा.वेताळवाडी 10.45 वा.आगमन 10.47 वा.प्रस्थान हातोला 11.08 वा.आगमन 11.10 प्रस्थान 11.30 ला.अमंळनेर (भां)येथे पोहचेल.व पुन्हा अंमळनेर हून
हिच गाडी अमंळनेर (भा) येथून आर्धा तास थांबून अमंळनेर-अहमदनगर दुपारी 12 वा.निघून हातोला येथे 12.18 आगमन,12.20 ला प्रस्थान, वेताळवाडी 12.43 आगमन 12.45 प्रस्थान,न्यू आष्टी आगमन 12.58 वा. प्रस्थान 13.00 वा.कडा आगमन 13.28 वा. प्रस्थान 13.30 वा.न्यू धानोरा आगमन 13.40 वा. प्रस्थान 13.42 वा. सोलापूरवाडी आगमन 13.58 वा. प्रस्थान 14.00 वा.न्यू लोणी आगमन 14.25 वा.प्रस्थान 14.27 वा., नारायणडोहो आगमन 14.53 वा.प्रस्थान 14.55. वा.अहमदनगरला दुपारी 15.55 वा. ला पोहचेल अशी माहिती अहमदनगर रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
(हे वेळापञक असून दर रविवारी रेल्वेगाडी बंद असते.)