व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आपल्यातीलच काहि सहकार्यांने विरोधात काम केल्याने माझा पराभव-माजी आ.भिमराव धोंडे

पराभवाचे शल्य अजूनही धोंडेंच्या मनात

0

click2ashti update-२०१९ च्या विधानसभा निवडणूकीचा भाजपाने सर्व्हे केला असता मराठवाड्यात भाजपाची एकमेव विजयाची जागा हि आष्टी विधानसभा मतदार संघाची होती.परंतु भाजपाच्या काहि लोकांनी आपल्या विरोधात काम केल्याने मला पराभवाला सामोरे जावे लागले.असे म्हणत माजी आ.धोंडे यांनी पराभवाचे शल्य अजूनही बोचत असल्याचे सांगीतले.
आष्टी शहरातील भाजपाच्या वतीने गाव चलो अभियना अंतर्गत आज दि.११ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.यावेळी,भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस डाॅ.अजय धोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के, अॅड.वाल्मिक निकाळजे,डाॅ.शैलाजा गर्जे,अॅड.रत्नदिप निकाळजे,शंकर देशमुख,संतोष नागरगोजे,बाबुराव कदम यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना माजी आ.धोंडे म्हणाले,मी जरी माजी आमदार असलो तरी अनेक जण माझ्या आशेवर आहेत.तुम्ही जर माझ्याकडून आपेक्षा ठेवतात तर तुम्ही देखील माझ्याशी गोड बोललं पाहिजे व आम्हीपण भाजपात आहोत सध्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याच्या बातम्या वर्तमान पञात येतात.मग आशावेळी आमच्या कार्यकर्त्यांचा पण विचार होणे गरजेचे असते पण आम्हाला कसलेच विचारात घेतले जात नाही.पण समोरचे नेते फक्त आमच्याकडून उपकाराची आपेक्षा ठेवतात आणि काहि देईचे म्हणलं की हात वर करतात.आणि हि प्रवृत्ती त्यांनी बदलली पाहिजे जर ते बदलत नसतील तर आपण बदल करू असे म्हणत नगर पंचायत निवडणूकीत आम्ही आमदार सुरेश धस यांना मदत केली.पण त्यांनी आपल्या कर्यकर्त्यांचा सन्मान ठेवला नाही.एवढेच नाहीतर आम्ही मंञ्याकडून नगर पंचायत साठी काहि निधी आणला तर हे नगर पंचायतचे पदाधिकारी NOC (नाहरकत) प्रमाणपञ देत नाही म्हणून हि मोगलाई आपल्याला नक्की दुरूस्त करावी लागेल असेही शेवटी माजी आ.धोंडे यांनी सांगीतले.
बीड लोकसभा निवडणूकीची जागा देशात सर्वाधिक मताने निवडूण येणार
नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा सरकार निवडून आणण्यासाठी बीड जिल्ह्यातील मुंडे भगीनीपैकी जो कुणी उमेदवार असेल त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडणून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोका गावागावात देऊन परत एकदा मोदी सरकार का असावे हे समजून सांगावे व बीड लोकसभा निवडणूकीची जागा देशात सर्वाधिक मताने निवडून आणण्याचे आवाहन माजी आ.भिमराव धोंडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.