आष्टी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.मोराळे यांची नाशिक येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून बदली
चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात घेतला पदभार
click2ashti update-गेल्या चार वर्षापासून आष्टी ग्रामिण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झालेले डाॅ.रामदास मोराळे यांची शासनाने नुकतीच पदोन्नोत्ती करत नाशिक जिल्ह्यातील चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात गेल्या चार वर्षापुर्वी रूजू झालेले वैद्यकीय अधिकारी डाॅ.रामदास मोराळे यांनी करोना काळात अत्यंत जबाबदारीने काम करत हाजारो रूग्णांचे प्राण वाचविले.तसेच भूलतज्ञ असल्याने ग्रामिण रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर महिलांची प्रस्तुती झाल्याने सर्व सामान्य नागरीकांचा ग्रामिण रूग्णालयात उपचार घेण्यासाठी कल वाढला होता.चार वर्षात अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत त्यांनी ग्रामिण रूग्णालयाची ओळखच बदलून टाकली.शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचे प्रमोशन(पदोन्नौत्ती)झाल्याने त्यांची नाशिक जिल्ह्यातील चोपडा येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.यांच्या या निवडीबद्दल आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भिमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी जि.प.अध्यक्ष सविता गोल्हार,समाजसेवक विजय गोल्हार,तालुका दूध संघाचे चेरमन आत्माराम फुंदे,नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,भाऊसाहेब लटपटे,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे,मुर्शदपूर ग्रा.प,चे माजी सरपंच संतोष चव्हाण,आष्टी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,व्यापारी संघटनेचे संजय मेहेर,राजू काका धोंडे,मोहन गलांडे,जयचंद नेलवाडे,संदिप धस यांच्यासह आदिंनी अभिनंदन केले.