व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

लोकसभा निवडणूकीत पोलिसांनी आपला धाक दाखवावा-जिल्हाधिकारी दिपा मुधोळ

आष्टी विधानसभा मतदार संघाची पाहणी करत दिल्या सुचना

0

click2ashti update-लोकसभेच्या २०१९ च्या उमेदवारांना ७० लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा होती. २०२४ च्या निवडणुकीत त्यामध्ये २५ लाखांची वाढ झाली असून आता ९५ लाख रुपये खर्च करता येणार आहेत.सभेला वाहनांची मर्यादा असणार नाही, मात्र त्या वाहनांचा खर्चात हिशेब करण्यात येणार असून वाहनांच्या ताफ्यात १० च्या पुढे गाड्या वापरता येणार नाहीत.नमुना मतपत्रिका छापण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी विधानसभा मतदार संघातील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ बोलत होत्या.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ/मुंडे यांनी मंगळवार दि.१९ रोजी सकाळी ११ वा.तहसिल कार्यालयात आष्टी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन बैठक घेण्यात आली.या बैठकीसाठी पाटोदा उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे,आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर,आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड, नायब तहसीलदार बाळदत्त मोरे,निवडणूक विभाग अव्वल कारकून राजेंद्र पवार,पाटोद्याचे तहसीलदार दत्तात्रय निलावाड आणि शिरूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार बाळासाहेब खेडकर आष्टीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, विशेष शाखेचे सद्दाम शेख, तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे यांचे सह विविध कार्यालयाचे खाते प्रमुख उपस्थित होते.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या,आगामी लोकसभा निवडणूक कालावधीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा मतदान अत्यंत पवित्र असा हक्क असून तो सर्व घटकांनी बजावावा मतदाना ऐवजी सुट्टी मध्ये सहलीला जाण्यास टाळावे आणि मतदान उपस्थित रहावे असे आवाहन करून त्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत निवडणूक आयोगा नुसार असलेल्या आदर्श आचारसंहिते चे काटेकोर पालन करावे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने ही निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात आणि
नि:पक्षपातीपणे पार पडावी यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात अशा सूचना दिल्या.आचार संहिता लागू झाल्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या सर्व शस्त्रास्त्र परवाने धारकांची अग्निशस्त्रे पोलीस ठाण्यात तात्काळ जमा करावीत असे सांगून याबाबत अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश दिले.तसेच आष्टी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमधील नियोजित मतदान पेट्या ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून समाधान व्यक्त केले त्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची पाहणी करून अवैध पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले त्या अगोदर आष्टी तहसील कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी थेट प्रवेश करून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करून विचारले की,तुम्ही अर्ज दिल्यानंतर किती दिवसांनी प्रमाणपत्र मिळते ? अशी चौकशी केली असता त्यावर उपस्थित त्यांनी अभिलेख विभागातील कर्मचारी याबाबत अत्यंत संवेदनशील असून तात्काळ कागदपत्रांची पूर्तता केली जाते याबाबत समाधानी असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.