व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मोटारसायक-टॅकर समोरासमोर अपघात;दोन तरूण जागीच ठार

आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील घटना

0

click2ashti update-कडा येथील काम आवरून दोघे मित्र दुचाकीवरून गावाकडे यात असताना अचानक समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड-नगर राज्य महामार्गावरील डोईठाण येथील शिवनेरी चौकात रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली.विठ्ठल अनिल तरटे,महादेव गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील विठ्ठल अनिल तरटे वय वर्ष १९ व पाटोदा तालुक्यातील पांढरवाडी फाटा नजीक असलेल्या सकुंडवाडी येथील महादेव गायकवाड हे दोन मित्र रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान दुचाकीवरून गावाकडे येत असताना बीड नगर राज्य महामार्गावरील डोईठाण परिसरात शिवनेरी चौकात बीड येथे डीझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या टँकर क्रमांक एम.एच १६,सी.सी.७६३१ याची जोराची धडक दुचाकी बसल्याने झालेल्या अपघातात दोघाचा जागीच मृत्यू झाला असून अपघात घडताच टँकर चालक पसार झाला होता.कडा पोलिस चौकीच्या पोलिसांनी त्या टँकर चालकाला टँकर सह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. आष्टी पोलिस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन,मयतावर आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करून,राञी उशीरा त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.