व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

साकत शिवारात १८०० लिटर गावठी दारू नष्ट;अंभोरा पोलिसांची कारवाई

0

click2ashti update-गावापासून दीड किलोमीटर अंतरावर नदीकडेच्या झाडाझुडपात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू बनवून त्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान गावठी अड्ड्यावर धाड टाकुन १८०० लिटर रसायनासह दोन लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केल्याची कारवाई अंभोरा पोलिसांनी केली.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील साकत शिवारात सिनानदी मध्ये झाडाझुडपात अवैद्य गावठी दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना समजाताच त्यानी शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकुन १८०० लिटर रसायन,बॅरल,कॅन व हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख ९० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.
ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके,पोलीस हवालदार मुकुंद एकशिंगे,मनोजकुमार खंडागळे,भारत माने,पोलीस नाईक अमोल ढवळे,पोलीस अंमलदार शिवदास केदार,सुदाम पोकळे,अमोल शिरसाठ यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.