व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

महावीर जंयती निमित्त मासविक्रीचे दुकाने बंद-नगराध्यक्ष जिया बेग

आष्टी नगर पंचायतचा निर्णय

0

click2ashti update-आष्टी शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.याच पार्श्वभूमीवर शहरातील रविवार दि.२१ रोजी महावीर जंयतीनिमित्त दिवसभर मास विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी नगर पंचायतच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती आष्टी नगर पंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देतांना बेग म्हणाले,-आष्टी शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.याच पार्श्वभूमीवर शहरातील रविवार दि.२१ रोजी महावीर जंयतीनिमित्त दिवसभर मटण, चिकन,मासे,विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून मांसविक्री होणार नाही.असा निर्णय आष्टी नगरपंचायत यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून,या आदेशाचे विक्रेत्यांनी पालन करावे असे आवाहनही नगराध्यक्ष जिया बेग यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.