माजी आ.भीमराव धोंडे यांचे बंधू बाप्पूराव धोंडे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
click2ashti update-मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचे कनिष्ठ बंधू बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,महेश (कडा) सहकारी साखर कारखान्याचे चेरमन बाप्पूराव आनंदराव धोंडे यांचे आज गुरूवार दि.२ रोजी पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
आष्टी तालुक्याच्या राजकारणात ते दोन पंचवार्षीक बीड जिल्हा परिषद सदस्य होते.महेश (कडा)सहकारी साखर कारखान्याचे चेरमन ही होते.आज गुरूवार दि.२ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अत्यंविधी गुरूवारी सकाळी १०.३० वा.त्यांचा जन्मगावी रुईनालकोल ता.आष्टी येथे होणार आहे.