अशी होणार मतमोजणी;३३ व्या फेरीत होणार निकाल जाहिर एक फेरी पुर्ण होणार पंधरा मिनिटात…
अटीतटीचा नाही तर माझा विजय निश्चीत-मुंडे;सर्व समाजाची साथीने मी १००% विजयी-सोनवणे
click2ashti update-राज्यभरात अंत्यत चुरशीची ठरलेल्या बीड लोकसभेची मतमोजणी मंगळवारी,शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर होणार आहे.सकाळी आठ वाजता एकूण १४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.मतमोजणीची एक फेरी पंधरा मिनिटांत संपणार आहे.मतमोजणीच्या ठिकाणाहून बीड-पिंपळनेर मार्ग जात असल्याने हा मार्ग आज दिवसभर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.मतमोजणीचा निकाल सर्वसामान्य मतदारांना कळावा म्हणून मतमोजणी केंद्राच्या परिसरात जिल्हा प्रशासनाने १० लाऊडस्पीकर बसवले आहेत. मतमोजणीसाठी एकूण अंदाजे १० तास लागणार असल्याचे सायंकाळी सहा वाजेपर्यंत लोकसभेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शंभर टक्के विजयाचे दावे केले आहेत.
मतमोजणीच्या अनुषंगाने आज दिवसभर बीड-पिंपळनेर मार्ग राहणार बंद रहणार असून पिंपळनेर-बीड मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मंगळवार, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे.त्यामुळे मंगळवारी पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे.बीडहून पिंपळनेरला जाणाऱ्या वाहनधारकांना बीड,तेलगाव नाका,नाळवंडी,म्हाळसजवळा मार्गे जावे किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा बीड,कुर्ला,भाटसांगवी,कुक्कडगाव मार्गे पिंपळनेरला जावे. पिंपळनेरहून येणाऱ्यांनीही हाच मार्ग अवलंबावा,असे आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.मिरवणुकीसाठी दोन्ही उमेदवारांनी अजून केला नाही अर्ज लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यासाठी अजून महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल झाला नाहीत.१५ जूनपर्यंत मनाई हुकूम आदेश जारी करण्यात आलेला असून मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
निकाल जाणून घेण्यासाठी लावले १० लाऊडस्पीकर बीड शहरातील शासकीय
तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात आज मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार असून नागरिकांना लोकसभेचा निकाल ऐकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० लाऊडस्पीकर मतमोजणी केंद्राच्या परिसरात लावले असून यातून निकाल पुकारला जाणार आहे.
मतमोजणीसाठी दोन हजार कर्मचारी तर बाराशे पोलिस तैनात
लोकसभा मतमोजणीसाठी एकूण ३३ राऊंड होणार असून प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी असणार आहेत. २ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतमोजणी प्रतिनिधी, दोन निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.तर बीड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ठिकाणी आज लोकसभेची मतमोजणी होणार असून मतमोजणी केंद्राच्या बाहेर १ एसआरपीएफची तुकडी असणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी एक अपर पोलिस महासंचालक, एक पोलिस अधीक्षक, ४ अपर पोलिस अधीक्षक, चार डीवायएसपी, ७० पोलिस अधिकारी, ५०० पोलिस, ३ राज्य राखीव दलाच्या कंपन्या, ६ दंगल नियंत्रक पथके, ७०० होमगार्ड तैनात असणारआहेत.
अशा होतील मतमोजणीच्या फेऱ्या
सहा मतदारसंघाची एकूण १४ टेबलवर एकाच वेळी मतमोजणी होणार असून एका फेरीसाठी किमान पंधरा मिनिटे लागणार आहेत. आष्टी ३२, माजलगाव २८, गेवराई २९, केज ३०, परळी २५, बीड २८ अशा मतदारसंघनिहाय फेऱ्या असणार आहेत.सर्वाधिक फेऱ्या आष्टी विधानसभेच्या होतील.
विधानसभानिहाय होणार मतमोजणी,यंत्रणा सज्ज
जिल्ह्यातील गेवराई, बीड, माजलगाव, परळी, आष्टी आणि केज या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला सहा हजार पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीचे १४ टेबल ठेवले आहेत. या १४ टेबलवरती मतमोजणीची एक फेरी ही पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी असतील.
मगच होईल विजयी उमेदवार घोषित..!
मतदानादिवशी माजलगाव येथील बूथ क्र. ६८ कर बूध एजंट समोर मॉक पोल केळी ५० मतदान करून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बरोबर आहे का याची चाचणी झाली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी मॉक पोलचे झालेले ५० मत हटवणे गरजेचे होते.मात्र माजलगावमध्ये ते ५०० मतन हटक्ता मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि या बूथवर ४६२ मतदान झाले.यामुळे प्रत्यक्ष मतदान आणि झालेले मतदान यामध्ये तफावत झाली.त्यामुळे विजयी उमेदवार जर ४६२ मताच्या फरकाने निवडून येत असेल तरच बूथ क्र. ६८ चेमतदान मोजले जाणार आहे.नसता हे मतदान नमोजताच विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहे.