पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागला;तरूणाने फेसबुकवर अलविदा पोस्ट करून संपविले जीवन
आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील घटना
click2ashti update-बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे याचा झालेला निसटता पराभव झाल्याने पोपट मधुकर वायभसे (वय ३६) वर्षिय तरूणाने गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना मंगळवारी रात्री चिंचेवाडी येथे घडली.
मयत पोपट याने फेसबुकवर केलेली पोस्ट
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे याचा पराभव झाल्याने हा पराभव मनाला लागल्याने मंगळवार दि.११ रोजी आपल्या फेसबुकर “आलविदा”ची पोस्टु करत रात्री चिंचेवाडी येथे एका झाडाला गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना घडली.शोकाकुल वातावरणात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.पाश्यात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.