व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अश्लिल व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी:माजी आमदार धोंडे यांना एक कोटीची मागणी

अहमदनगर येथील कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

0

click2ashti update-अश्लिल व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांना तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी नगरमधील दोन महिलांसह तीनजणांवर नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात आज (दि.२९) मध्यरात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आमदार धोंडे यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास स्वतः फिर्याद दिली असून आरोपी महिला कल्पना सुधीर गायकवाड (रा. नगर), महिला बांगर (पूर्ण नाव व पत्ता नाही), इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बॉक्सर (रा. नगर) यांनी संगनमत करून तुमची अश्लिल व्हिडिओ क्लीप आमच्याकडे आहे.ती सोशल मिडियावर प्रसारीत करून तुमची बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमची राजकीय कारकिर्द संपवून टाकू अशी धमकी देत माजी आमदार धोंडे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.तसेच आरोपींपैकी ईस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बॉक्सर याने आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून यातील २५ हजार रुपये स्वीकारले. हा प्रकार जानेवारी महिन्यापासून दि.२६ या कालावधीत नगरमधील हॉटेल रॉयल येथे घडला.जूनपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या फिर्यादीनुसार वरील तीन आरोपींविरुद्ध नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षिका योगिता कोकाटे या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.