भुशी धरणात तिघांचे मृत्यू देह सापडले;दोन चिमुकल्यांचा शोध सुरू
रविवारी गेले होते धरणात वाहून;एकाच कुटुंबातले पाच जण-पहा संपूर्ण व्हिडिओ
click2ashti update-लोणावळा शहरा जवळील नामांकित भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहातून पाच पर्यटक भूशी धरणात वाहून गेल्याची घटना रविवार दि.30 रोजी घडली होती.यामध्ये आत्तापर्यंत तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत.तर दोन चिमुकल्यांचा अद्याप शोध सुरू आहे. याठिकाणी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
दरम्यान,धरणात वाहून गेलेल्यांमध्ये एक महिला आणि चार मुलांचा समावेश होता.यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत.तर दोन चिमुकल्यांचा शोध सुरू आहे.भारतीय नौदलाच्या पथकाकडून सध्या हे शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील रविवारी समोर आला होता.
एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले
लोणावळ्यात वर्षाविहासाठी गेलेले पाच जण वाहून गेले होते. अन्सारी हे कुटुंब भुशी धरणाच्या वर असलेल्या जंगलात वॉटर फॉल (बॅक वॉटर) येथे वर्षाविहाराचा आनंद घेत होते.तेव्हा,पाच जण या वॉटर फॉलमधून भुशी धरणात वाहून गेल्याचे लोणावळा पोलिसांनी माहिती दिली आहे.अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे पाच जण वाहून गेले होते.