व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ज्ञानराधा तील चार लाख खातेदारांचे,पावणे चर हजार कोटी अडकले-आर्थिक गुन्हे शाखेची माहिती

0

click2ashti update-ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिस तपासातून घोटाळ्याचा डोळे दिपवणारा आकडा समोर आला आहे.ज्ञानराधा पतसंस्थेत पावणेचार लाख ठेवीदार आणि बचत खातेदार यांचे तब्बल ३ हजार ७१५ कोटी ५८ लाख ७२ हजार रुपये अडकलेले असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.तर,सुरेश कुटेंच्या राज्यभरातील २०० कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या १२० मालमत्तांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.इतर राज्यातील मालमत्तांचाही शोध सुरु असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
सुरेश कुटे अध्यक्ष असलेली ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था कुटे ग्रुपवर नोव्हेंबर २०२३ मध्ये पडलेल्या प्राप्तीकर विभागाच्या छाप्यानंतर आर्थिक अडचणीत आलेली आहे.ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास पतसंस्था असमर्थ ठरल्याने पतसंस्थेत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, ९ महिने उलटूनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी पोलिस व न्यायालयात धाव घेत गुन्हा नोंद करण्याचे सत्र सुरु केले होते.ज्ञानराधाच्या बीड जिल्ह्यात २२ शाखा असून, आतापर्यंत ३५ गुन्हे नोंद झाले आहेत. २० कोटी २२ लाखांच्या फसवणूक प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत.तर पोलिसांनी ज्ञानराधा मधील सॉफ्टवेअर मधील माहिती मिळवली असून,त्यानुसार मुदत ठेव ठेवणाऱ्या खातेदारांची संख्या १ लाख ६५ हजार ८७२ इतकी आहे. त्यांनी १७९० कोटी १ लाख ३७ हजारांची मुदत ठेव ठेवली आहे.तर,बचत खाते असलेल्यांची संख्या २ लाख ६ हजार ६९७ आहे.
संपत्ती २०० कोटींची
सुरेश कुटे व कुटुंबीयांच्या २०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या १२० संपत्तीची माहिती पोलिसांना मिळाली आहे.तर,इतर राज्यातील नोंदणी महानिरीक्षकांनाही पोलिसांनी पत्र देत कुटेंच्या संपत्तीची माहिती मागवली आहे.कुटेच्या २४ लाख २० हजार रुपयांची ३ वाहने जप्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.