माजी मंत्री धस यांच्या मागणीला यश;जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे येत्या 45 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश
click2ashti update-आष्टी-पाटोदा-शिरूर या तीनही तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित होती.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये पुढील 45 दिवसांच्या आत सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले असल्याची माहिती माजी मंत्री सुरेश धस यांनी दिली.
शेतकरी आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज करतात.शेतकऱ्यांची प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे तशीच अनेक दिवस पडून असतात.याच जमीन मोजणी संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी अखेर सुरेश धस यांच्याकडे याबाबत तातडीने शासनाला आदेशित करून मोजणी बाबत समस्या मांडल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे माजी मंत्री सुरेश धस यांच्या उपस्थितीत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार संभाजीनगर विभागाचे उप संचालक,भूमिअभिलेख,जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हाअधीक्षक, भूमिअभिलेख,आष्टी,पाटोदा,आणि शिरूर चे उपअधीक्षक भूमिअभिलेख यांची ऑनलाईन बैठक पार पडली.यामध्ये सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील 220,पाटोदा तालुक्यातील 92, तर शिरूर कासार येथील 199 प्रकरणे साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी अति अति तातडीची मोजणी ची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगत मोजणी वेळी सर्वेअर हजर न राहणे,मोजण्यांची दिलेल्या तारखेचा अवमेळ तर उपविभागीय कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणे यामध्ये जो मोठा कालावधी जातो त्यामुळे दिरंगाई होते.यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून प्रचंड नाराजीचा सूर शेतकरी वर्गामध्ये असल्याचे निदर्शनास आणून दिले.यावर तात्काळ दखल घेत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांनी संबंधित सचिव,तसेच जिल्हाधिकारी बीड यांना याबाबत पुढील 45 दिवसात ही सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेशित केले.त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी मंगळवारपासून संबंधित भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्क करून शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित असलेली मोजणी पूर्ण करण्याचे आवाहन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले आहे.