व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुक्यातील पाणंद रस्त्याचा बोजवारा; तहसीलदारांचे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष…!

25/15 चा रस्ता दाखवला,पाणंद रस्ता;बोगस बिले लाटण्याचा प्रयत्न,गावकऱ्यांनी पाडला हानून

0

click2ashti update-तालुक्यातील आरणविहरा ते रामगुडे वस्ती एक कि.मी.पाणंद रस्त्याला मंजुरी मिळाली.परंतु हे काम सन २०१९-२० मध्ये झालेल्या २५/१५ मधून रस्त्यावर दाखवत बोगस बिल उचलण्याचा प्रकार घडत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येतात गावकऱ्यांनी हा पाणंद रस्ता काम अडवत याबाबतची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली.परंतु गेल्या दिड महिन्यात आष्टी तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी कसलेच लक्ष देता या तक्रारीकडे जाणून-बुजून “अर्थपूर्ण” दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तक्रारदार उद्धव शिरसाठ यांनी केला आहे.
याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की,
मौजे अरणविहिरा येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अरणविहिरा ते रामगुडे वस्ती या रस्त्याचे एक किलोमीटर अंतराचे काम बोगसरित्या मंजूर करण्यात आले आहे.हे काम सन २०१९-२० मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून २५-१५ लेखाशीर्षाखाली पूर्ण करण्यात येऊनही या रस्ता कामास बोगसरित्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून सुमारे २५ लक्ष रुपयांचे बोगस अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
या रस्त्यावर काहीही काम न करता संबंधित कंत्राटदारांनी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून बोगसरित्या मजुरांमार्फत काम केल्याचे दाखवून लाखो रुपयांचे देयक उचलले आहे.कुशलची रक्कम उचलून अपहार करण्यासाठी मशीन आणून थातूरमातूर काम दाखविण्याचा प्रयत्न आम्ही ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे.तसेच या कामास बोगस मंजुरी देणारे अधिकारी,कर्मचारी यांच्यासह बोगस काम करून शासकीय निधीचा अपहार करणारे कंत्राटदार यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत.याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास आम्ही ग्रामस्थांसह तहसील कार्यालय आष्टी येथे आंदोलन करणार आहोत,याची कृपया गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी दिलेल्या तक्रारीत केली आहे.याबाबत आष्टी तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना बाजू विचारण्यसाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.

जर कारवाई केली नाही तर आत्मदहनाचा इशारा
सदरील कामाची तक्रार दिल्यानंतर मी व गावकरी अष्टी तहसील कार्यालयात किमान 20 वेळेस जाऊन आम्हाला तहसीलदार गायकवाड साहेब भेटले नाहीत.तसेच आम्ही दिलेल्या निवेदनावर कसली चर्चा केली नाही.येत्या दहा दिवसात जर संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही.तर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार उद्धव शिरसाठ यांनी दिला आहे.
पाणंद रस्त्यांची बऱ्यापैकी कामे कागदावरच मार्गी लावण्याचा प्रयत्न
शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी दिला.हा निधी काम न करता उचलण्याचा प्रयत्न अधिकारी व राजकारणी करत असल्याचा दिसत आहे.तरी याबाबत जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.