लवकरच आष्टी-पुणे रेल्वेसेवा सूरू करणार-केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे
अहमदनगर-सध्या सुरू केलेल्या न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे सेवा करून आम्ही यावरच थांबणार नसून न्यू आष्टी ते पुणे रेल्वेसेवा काहि तांञिक बाबींमुळे अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी आपण मुंबई येथील रेल्वे अधिका-यांना सुचना दिल्या असून,यावर लवकरात लवकर तोडगा काढून आष्टी-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याची ग्वाही रेल्वेराज्यमंञी ना.रावसाहेब दानवे यांनी दिली.
अहमदनगर ते न्यू आष्टी या दुस-या फेरीचा रेल्वे शुभारंभ रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्याहस्ते आज गुरूवार दि.१७ रोजी उदघाटना प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खा.प्रितम मुंडे,खा.डाॅ.सुजय विखे,आ.बबनराव पाचपुते,आ.सुरेश धस,मुख्य प्रबंधक अलोक सिंग यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना ना.दानवे म्हणाले,नगर-बीड-परळी असा मार्ग व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून होती.पण स्व.गोपीनाथ मुंडे यांनी खासदार झाल्यावर त्यांची ती अग्रणही मागणी बीडची रेल्वे सुरू करा अशी होती.अन् त्यांनी मागणी केली त्यावेळेस मान्यता मिळाली आहे.तसेच आष्टी-बीड हा रेल्वेमार्ग ३० डिसेंबर २०२३ पर्यंत पुर्ण करून बीड-मुंबई ही रेल्वेसेवा सूरू करणार करून स्व.मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण होणार आहे.न्यू आष्टी-अहमदनगर सेवा सूरू झाली पण ब-याच जणांनी आष्टी-मुंबई,आष्टी पुणे ही रेल्वे सेवा सुरू करा अशी मागणी केली.पण आष्टी-मुंबई हि रेल्वेसेवा सध्या शक्य नसून,आपण आष्टी-पुणे हि रेल्वे सेवा काहि तांञिक अडचणी मुळे रखडली आहे.लवकरात लवकर हि अडचण दुर करण्याचे आदेश आपण रेल्वे अधिकारी यांना दिले आहेत.बीड आणि नगर चे खासदारांना सोबत घेऊन बैठकीत हा प्रश्न मार्गी लावू तसेच हि रेल्वेसेवा अधिक पुढे जाण्यासाठी काम करणार असल्याचे असेही त्यांनी सांगीतले.यावेळी खा.डाॅ.सुजय विखे म्हणाले,न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे सेवेने बीड व अहमदनगर दोन जिल्हे विकासात्मक दृष्टीने एकमेकांना जोडणार आहेत.
यावेळी खा.प्रितम मुंडे म्हणाल्या,एका महिन्याच्या आत मागणी पुर्ण करणारा मंञी म्हणजे रावसाहेब दानवे हे असून,एक महिन्यात बीडकरांची मागणी पूर्ण केली.सूरू केल्यानंतर ही रेल्वे परवडेल का नाही असे वाटत होते तरी सुध्दा ना.दावने साहेबांनी बीडकरांना भरभरून दिले अन् पुन्हा दुसरी रेल्वे सुरू केली.पण आमचे स्वप्न अर्धेच पुर्ण झाले आहे.अजूनही आष्टी ते परळी आणि परळी ते मुंबई हि रेल्वे सुरू झाल्यावरच ख-या अर्थाने स्वप्न पुर्ण होणार आहे.आणि रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी ग्वाही दिल्याने आता हा रेल्वे मार्ग लवकरच पुर्ण होणार यात तिळमाञ शंका नसल्याचे खा.मुंडे यांनी सांगीतले.