व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शिराळ च्या खुनातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या;न्यायालयाने १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

0

click2ashti update-आष्टी तालुक्यातील शिराळा येथील तरूणाचा कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात शिवारात खून करणाऱ्या आरोपीस मिरजगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत गजाआड केले.अशोक प्रभाकर आजबे (वय ३३,रा.शिराळ ता.आष्टी,जि. बीड) असे या घटनेतील मृताचे नाव आहे.त्याच्या खूनप्रकरणी योगेश विजय आजबे (वय २७,रा.शिराळ) यास अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली.याबाबत मृत अशोक आजबे यांचे मामा रामचंद्र भगवान खोटे (वय ५३) यांनी फिर्याद दिली.त्यानुसार, १२ ऑगस्ट रोजी अशोक आजबे हा रातंजन (ता.कर्जत) येथे मामाच्या गावी काल्याच्या कीर्तनात पंगत देऊन रात्री आठ वाजेच्या सुमारास पत्नी-मुलासह दुचाकीवर कर्जतला जात होता.चिंचोली काळदात येथील चढावर मागून आलेल्या दुचाकीवरील तरुणाने लाकडी दांडक्याने फटका मारल्याने अशोक पत्नी-मुलासह खाली पडला.त्यानंतरही त्याला मारहाण करुन आरोपी पळून गेला.नगरला शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास मृत असल्याचे घोषित केले. पोलिसांनी संशयावरून योगेश विजय आजबे यास ताब्यात घेतले असता,त्याने गुन्ह्याची कबुली दिली.अशोक आजबे हा त्याची पत्नी व माझे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने माझी बदनामी होत होती.त्यामुळे दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून केल्याचे त्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.