घर मालकाने हवेत गोळीबार करताच;दरोडेखोरांनी काढला पळ
गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांनी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या
click2ashti update-पहाटेच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीत आलेल्या सहा जणांनी घरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत सोनं-नाणे काढून द्या आरडाओरड करू नका अशी धमकी देत धिंगाना घातला होता.मारहाण करून सोने-नाणे चोरीला जाईल.या भितीपोटी घरमालकाने परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केला अन् दरोडेखोरांचा प्रयत्न अयशस्वी झाला.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शुक्रवारी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील किन्ही व केरूळ परिसरात दरोड्याच्या घटना घडल्याने पोलिस ॲक्शन मोडवर आले होते.तर काही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गस्त सुरू केली.पोलिसही डोळ्यात तेल घालून दरोडेखोरांच्या मागावर होते.शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान चोभानिमगांव येथील सतीश झगडे याच्या घरी कोयता,लोंखडी गज,गलवर,करवत घेऊन दरोड्याचा प्रयत्न करत असताना त्यानी परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केल्याने अनर्थ टळला.आणि दरोडेखोर मोटारसायकलवरून सुसाट निघाले असता.भवरवाडी रस्त्यावर गस्तीवरील ग्रामस्थांनी यांना थांबवून हटकले.एवढ्यात यातील तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.तर पोलिसांना ही घटना समजाताच कसलाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन तिघाजणांना ताब्यात घेतले व सतीश झगडे याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील रोहित शंकर मोरे,किरण गुलाब मोरे,अजय सुखदेव शिंदे,अक्षय पवार,विशाल बर्डे,गुलाब मोरे याच्यावर दरोड्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आष्टीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे करीत आहेत.