काळ्या टोपी खाली..मेंदू सडका..! भगतसिंग कोश्यारींची जीभ पुन्हा घसरली
मुंबई वृत्तसेवा-काळ्या टोपीखालचा मेंदू सडका आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पार्सल महाराष्ट्राबाहेर पाठवा. त्यांची बौद्धिक उंची कमी आहे.त्यांनी उचलली जीभ आणि लावली टाळाला,अशा प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर येत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ आज झाला.यावेळी शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले कोश्यारी?
भगतसिंह कोश्यारी आपल्या भाषणात म्हणाले की,आमच्या शाळेत तुमचे आदर्श कोण असे विचारले जायचे. त्यावेळी कुणी सुभाषचंद्र बोस तर कोणी नेहरू, तर कोणी गांधी सांगायचे.आता नव्या युगाचे मी सांगतो आहे. तुम्हाला दुसरीकडे शोधायची गरज नाही.याच महाराष्ट्रात तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते डॉ. नितीन गडकरी हे आदर्श आहेत. असे म्हणत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही केली. विद्यार्थी मित्रांनो,तुम्हाला जर कोणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या.तेच नव्या युगाचे शिवाजी महाराज आहेत.शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी है..!, असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्राबाहेर पाठवा…
युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की,राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही.त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या,अशी विनंती मी हात जोडून पंतप्रधानांना करतो.अशी व्यक्ती आम्हाला नकोय.जी महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवतायत.असा घाणेरडा विचार घेऊन ते येऊच कसे शकतात.
भाजपाचे आता तोंड बंद का?
सावरकरांचे एक माफी नामा मागीतलेले पञ काॅग्रेसनेते राहूल गांधी यांनी दाखविले तर भाजपाने महाराष्ट्रासह देशात हिदुंत्ववाद पेटवत सावकरांचे दाखले देत पुरावे दाखविले.आता महाराष्ट्राचे दैवत असलेले छ.शिवाजी महाराज यांच्या विषयीगरळ ओकणा-या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना छ.शिवाजी महाराजांचे दाखले दाखविणार का? अशी टिका सोशल मिडीयावर होत आहे.