जागतिक फोटोग्राफर दिन वशेष-नोकरीच्या मागे न लागता मॉडेलिंग फोटोग्राफीमध्ये करिअर घडविणारा अवालिया-सागर ढोले
click2ashti update-मेहनत करण्याची तयारी असेल आणि जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास असेल तर व्यक्ती एक दिवस यशस्वी नक्की होते. आणि आपली स्वप्न नक्की पूर्ण करतो.घरची परिस्थिती हालाखीची असतानाही डी.एड.करून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले तिथेही अपयश आले त्यानंतर पुन्हा बी.एड.करून माध्यमिक शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले तिथेही पुन्हा अपयशच आले त्यामुळे निराश न होता व नोकरीच्या मागे न लागता वडिलांचा परंपरागत फोटोग्राफीच्या व्यवसायामध्ये पदार्पण केले.बीड,अहमदनगर, मुंबई,संभाजीनगर,पुणे इत्यादी ठिकाणी जाऊन फोटोग्राफीतील नामवंत तज्ञांकडून फोटोग्राफीतील शिक्षणाचे धडे गिरवले आणि अवघ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये कडा येथील उच्चशिक्षित सागर ढोले या अवालिया तरुणांने फोटोग्राफीमध्ये आपले नाव कमावले.आज बीड अहमदनगर संभाजीनगर पुणे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये सागर ढोले या तरुणाची फोटोग्राफी ग्राहकांना भुरळ पाडत आहे.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांचा फोटोग्राफीचा परंपरागत व्यवसाय होता .त्याकाळी फोटोग्राफी फक्त छंद म्हणून नव्हे तर लोक शासकीय कामासाठी फोटो लागतील एवढेच फोटो काढत होते. तोडकामोडका धंदा यावर चंद्रशेखर ढोले यांनी दोन मुली व सागरचे शिक्षण करण्याचे ठरवले .फोटोग्राफीच्या व्यवसायामध्ये भविष्य नाही ही गोष्ट त्यांनी उराशी बाळगून सागर यास बारावीनंतर सोलापूर येथे डीएड करण्यासाठी पाठवले.डीएड होऊन मुलगा शिक्षक होईल व चार पैसे मिळतील व कुटुंब सुखी राहील असा त्यांचा हेतू होता. डीएड केल्यानंतरही सागर यास नोकरी न लागल्याने पुन्हा वडिलांनी त्याचे बीएड करण्याचा निर्णय घेतला.आष्टी येथे बीएडचे शिक्षण पूर्ण करूनही शिक्षक होण्याचे स्वप्न मात्र अधुरीच राहिले.त्याचे कारण असे की बीएड झाल्यानंतर कोणताच संस्थेवाला फुकट नोकरी देत नाही. प्रत्येक संस्थेवाला किमान 20 लाख रुपये तरी नोकरी देण्यासाठी मागत होता. याच दरम्यान सागरने अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षाही दिल्या त्यामध्येही अपयश येत गेले.वडिलांनी एवढ्या हालाखीच्या परिस्थितीत आपल्याला शिक्षण दिले अन नोकरी लागली नाही. वडिलांनी उराशी बाळगलेले स्वप्न आता अधुरीच राहते की काय असा समज त्याचा झाला.परंतु सागरने खचून न जाता जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर वडिलांच्या व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचे ठरवले.सुरुवातीला वडिलांनी या व्यवसायात येऊ नको असा सल्ला दिला.मात्र शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही यामुळे सागरने पक्का विचार करून फोटोग्राफीच्या व्यवसायातच आपण नाव व पैसा कमवू अशी आशा बाळगली.त्याने सुरुवातीला ग्राफिक डिझाईनचे काम सुरू केले परंतु ग्राफिक डिझाईन मध्ये शक्यतो राजकीय नेतेमंडळीच काम देत असत. त्यासही फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने मॉडेलिंग फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले.मॉडेलिंग फोटोग्राफीचे संभाजीनगर बीड अहमदनगर पुणे मुंबई या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतले .त्यानंतर चांगल्या उच्च प्रतीचा कॅमेरा व स्टुडिओचे चांगली रंगरंगोटी करून तरुणाईला भुरळ पाडन अशी सुंदर मनमोहक कलेतून फोटो काढण्याचे काम सुरू केले.सागरच्या कलेवर व त्यांच्या फोटोवर तरुणाई भुरळत गेली.दरम्यानच्या काळात सोशल मीडिया हा तरुणाईमध्ये फार मोठा ट्रेड सुरू झाला होता.सोशल मीडियावर आपले फोटो असावेत अशी तरुणाईचे इच्छा असायची.पाहता पाहता सागर ढोले यांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. वरचेवर ग्राहक वाढत होते .पुन्हा नव्याने सागर ढोले यांनी संभाजीनगर व बीड येथे जाऊन नुकतेच जन्मलेल्या म्हणजेच आठ दिवस ते वीस दिवस पर्यंतच्या बाळांचे फोटो काढण्यासाठी नवीन कलादालन सुरू केले.या न्यू बोर्ड किड्स फोटोग्राफीमध्ये लहान बाळांना हाताळणे लहान बाळांसाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे पोजसाठी लागणारे साहित्य मुंबई पुणे संभाजीनगर इथून खरेदी केले.पुन्हा तीन वर्षापर्यंतच्या बाळांचे फोटो काढणे सुरू केलक.त्यासाठी साहित्य खरेदी करतानाही अनेक कला कौशल्य युक्ती वापरून,काही साहित्य स्वतः बनवले. जेणेकरून लहान बाळांचे फोटो अधिकाधिक आकर्षक होत गेले.विशेषता महिला वर्गांमध्ये लहान बाळाचे फोटो काढण्याची क्रेज मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये आहे तेच फोटो ग्रामीण भागामध्ये मिळू लागल्याने त्यांच्या कलादालनामध्ये अक्षरशः रीग लागलेली होती.त्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे त्यासाठी लागणारे वेगवेगळे छत्र्या पडदे अशाप्रकारे अत्याधुनिक असे कलादालन झाल्याने आष्टी तालुक्यामध्ये मोठा प्रतिसाद त्यांना मिळू लागला.फोटोग्राफीमध्ये नवीन तंत्रज्ञान आल्याने व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याने शहरी भागामध्ये जे लोक छंद म्हणून फोटोग्राफीसाठी जात होते त्यांना ग्रामीण भागामध्ये ही उत्कृष्ट फोटो तयार करून मिळू लागले.याच जोरावर शिक्षण होऊनही नोकरी लागली नाही हे रडगाणं न गाता जिद्द चिकाटी व आत्मविश्वास असेल तर व्यवसायातही प्रगतीच्या शिखरावर जाऊ शकतो हे सागर ढोले यांनी आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला दाखवून दिले आहे.ग्राहकांना दर्जेदार फोटो जर दिले तर व्यवसाय वाढू शकतो. ग्राहकांना नवीन व दर्जेदार आणि विश्वास संपादन करत त्यांनी आजपर्यंत हजारो ग्राहकांना जोडून ठेवले आहे.गेल्या दहा वर्षांपूर्वी लोक गरज म्हणून फोटो काढत होते परंतु आता छंद म्हणून फोटो काढत आहेत.पूर्वीच्या काळी शासकीय कामासाठी जर फोटो लागत असेल तरच फोटो काढत होते.आता मात्र मोबाईल आले आणि या मोबाईलच्या अतिवापरामुळे फोटोग्राफीचा व्यवसाय ही पोषक ठरत चालला आहे.गेल्या काही वर्षापासून स्मार्टफोन आल्यामुळे अनेकांना असे वाटत होते की फोटोग्राफीचा व्यवसाय बंद पडेल परंतु स्मार्टफोन आल्यामुळे लोकांना फोटोग्राफीचा छंद लागला मात्र मोबाईल मधील फोटो आणि कलादालनात काढलेले फोटो यामध्ये खूप मोठा फरक असल्याने याच मोबाईल मुळे अनेक ग्राहक वाढले व ग्राहकांना फोटोचा छंद लागला असेही सागर ढोले सांगतात.मोबाईल मुळे फोटोग्राफीचा व्यवसाय भरभराट आली आहे असे त्यांचे मत आहे.सागर ढोले यांच्या पत्नी निशा ढोले याही विज्ञान विषयातील पदवीधर असून त्यांनाही फोटोग्राफीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लहान बाळांचे फोटो काढण्यासाठी निशा ढोले याही या कलादालनामध्ये आपल्या विविध कल्पक बुद्धीने लहान बाळांचे फोटो काढण्यात तरबेज आहेत.महिला असूनही अत्यंत दर्जेदार असे लहान बाळांचे फोटो व बाळांच्या आठवणी आई-वडिलांना मोठ्या कल्पकतेने व सुंदर मनमोहक देत आहेत.आज जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त या दांपत्यास खूप खूप शुभेच्छ..!
(शब्दांकन-रघुनाथ कर्डिले,कडा)