व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शाळकरी मुलींची छेडछाड;आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

आरोपी सीसीटीव्हीत कैद

0

click2ashti update-शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा सुटल्यानंतर रस्त्याच्या कडेला आडवूण शाळकरी मुलींची छेड काढणार्‍यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.सदरील प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला (मुलींची) शाळा असून या ठिकाणी शहरासह तालुक्यातील हजारो मुली शिक्षण घेत आहेत.सदरील शाळा सुटल्यानंतर आज शुक्रवार (दिनांक 23) दुपारी चार वाजता खडकत रोडवरील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींना अडवून त्यांची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे‌.सदरील मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पुन्हा शाळेत जाऊन घडलेला प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला.शाळेचे मुख्याध्यापक यांनी संबंधित पालकांना बोलून पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण हकीगत सांगतली.याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या आरोपी खडकत रोडवरील सिटी सीसीटीव्ही कॅमेरात प्रकार कैद झाला असल्याचे बोलले जात आहे. आता यावर पोलीस आपला खाकी दाखवतात का? आरोपीला पकडतात का? हे येणारा काळ सांगेल.
पालकांनी जागरूक व्हावे
सध्या बलात्काराच्या व छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत‌.अजून बदलापूर सारखी भयान घटना समोर असतांनाच आष्टी सारख्या छोट्या शहरातही छेडछाडीचे प्रकार भयानक आहे.आशा प्रकाराला आळा घालण्यासाठी नगर पंचायत आष्टी शहरामध्ये दोन ठिकाणी तक्रार पेटी ठेवणार आहे.तसेच पालकांनीही जागरुक राहणे गरजेचे आहे.
जिया बेग,नगराध्यक्ष न.प.आष्टी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.