तीन वर्षांनंतर आष्टी नगर पंचायतला पुर्णवेळ मुख्याधिकारी;ऋतुजा पाटील यांनी स्विकारला पदभार
नगराध्यक्ष जिया बेग यांनी केले स्वागत
click2ashti update-गेल्या तीन वर्षांनंतर आष्टी नगर पंचायतला कायम स्वरुपी पुर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून बीड येथील प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून ऋतुजा पाटील यांची नियुक्ती झाली असुन,त्यांनी आष्टी नगर पंचायतीचा पदभार स्विकारला आहे.त्यांचे नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे व सर्व नगरसेवक आणि कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.
राज्यातील जवळपास ७० नगर पालिका,परिषद तथा नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदावर प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी पदी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.कालच राज्याच्या नगर विकास मंत्रालयाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करून संबंधितांना त्वरित रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.यामध्ये आष्टी नगरपंचायत मुख्याधिकारी पदी ऋतुजा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यसेवा (मुख्य) परिक्षा-२०२१ च्या अंतिम निकाला व्दारे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-९ अंतर्गत मुख्याधिकारी गट-अ आणि गट-ब या संवर्गासाठी निवड झालेल्या उमेदवारांना विभागाच्या आदेशान्वये खातेनिहाय जिल्हा संलग्नता देण्यात आली आहे. सदर खातेनिहाय जिल्हा संलग्नता पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-९ अंतर्गत खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संलग्नता प्रशिक्षण चालु असलेल्या मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील १५ व गट-ब संवर्गातील ७१ परिविक्षाधीन मुख्याधिकाऱ्यांची On field Training स्वरुपात पदस्थापना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.३ येथे दर्शविलेल्या नगरपरिषदा,नगर पंचायती व महानगर पालिकेत करण्यात येत आहे.
सर्वसामान्य जनतेचे कामे लागतील मार्गी
आष्टी नगर पंचायत ला गेल्या तीन वर्षांपासून कायम स्वरुपी पुर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने येथील पदभार नायब तहसिलदार यांना देण्यात आला होता.आता कायम स्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने नगर पंचायत कर्मचारी यांच्यावर वचक राहिल आणि सर्वसामान्य जनतेचे कामेही मार्गी लागतील.