आष्टीत बुधवारी होणाऱ्या दहीहंडी महोत्सवास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-जयदत्त धस
click2ashti update-येत्या बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी आष्टी शहरात होणाऱ्या भव्य दहीहंडी महोत्सवास आष्टीसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते जयदत्त धस यांनी केले आहे.
आष्टी शहरातील पंचायत समिती प्रांगणात बुधवार (दि. 28) ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता जयदत्त धस युवा मंचच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवासाठी माजी मंत्री सुरेश धस यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक,सई मांजरेकर,झेबा शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या महोत्सवामध्ये डीजेच्या तालावर तरुणाई फिरकणारा असून निशा कुसेकर ही प्रसिद्ध सूत्रसंचालिका या महोत्सवाचे सूत्रसंचलन करणार आहे.या दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आष्टी शहरात होणाऱ्या या दहीहंडी महोत्सवास आष्टी तसेच तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन युवा नेते जयदत्त धस यांनी केले आहे.