व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विद्यार्थ्यांनीच्या छेडछाड प्रकरणात,पोलिस तपासात “मुख्याध्यापकाची” उदासिनता..!

पंच होण्यास टाळाटाळ...

0

click2ashti update-शहरातील एका जिल्हा परिषद या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनींची शुक्रवार (दि. 24) ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता छेडछाड झाल्याची पिडीत मुलीच्या वडिलाने आष्टी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात पोलिसांना तपास करण्यासाठी आवश्यक असलेला घटना पंचनामा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ह्यांना पोलिसांनी विचारले असता त्यांनी या प्रकरणी माझा काही संबंध नाही,ही घटना शाळेत घडली नाही,सदरील घटना शाळेच्या आवारात घडली नसल्याने आमचा संबंध काय? त्यामुळे जर तपास कामात शाळेचे मुख्याध्यापकच अंग काढून घेतल्याने पोलिस तपास कसा करणार?जर हे प्रकरण एवढे मोठे असून,शाळेचे मुख्याध्यापक,विद्यार्थीनीचे पालक यांना कसलेच गांभिर्य नसल्याने आता पोलिस तपास कसा करणार?आरोपी कसा पकडणार?पुन्हा घटना घडल्यातर पोलिसांना दोष देण्यास नागरीक तयारच असतात.या घटनेचे वरिष्ठांनी गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,आष्टी शहरातील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी शहरासह तालुक्यातील हजारो मुली शिक्षण घेत आहेत.सदरील शाळा सुटल्यानंतर शुक्रवार (दिनांक 23) दुपारी चार वाजता खडकत रोडवरील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींना अडवून त्यांची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे‌.सदरील मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पुन्हा शाळेत जाऊन घडलेला प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला.शाळेचे मुख्याध्यापक यांनी संबंधित पालकांना बोलून पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण हकीगत सांगतली.याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी या आरोपी खडकत रोडवरील सीसीटीव्ही कॅमेरात प्रकार कैद झाला व त्याची ओळखही पोलिसांना पटली आहे.पण आता पोलिसांना या तपास कामासाठी सरकारी पंच म्हणून शाळेचे मुख्याध्यापक,पिडित मुलींचे पालक व काहि घटनास्थळावरील व्यक्ती असे लागतात.पालकांनी व नागरीक पंच झाले पण सरकारी पंच म्हणून शाळेचे मुख्याध्यापक यांना बोलविले असता ते उडवा-उडवी चे उत्तरे देऊन आरोपीला पाठिशी घालत तर नाहीत अशी चर्चा सुरू आहे.यातील आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी दिली.

माझा काहि संबंध नाही..!
याबाबत पत्रकारांनी शाळेचे मुख्याध्यापक यांना तपास कामासाठी पोलिसांना पंच म्हणून का? गेले नाहीत असे विचारले असता या प्रकरणी माझा काही संबंध नाही,ही घटना शाळेत घडली नाही,सदरील घटना शाळेच्या आवारात घडली नसल्याने आमचा संबंध काय? असे उडवा-उडवी चे उत्तरे देऊन वेळ मारून नेली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.