व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी ५५ हजार बहिणींसोबत चार भावांनी ही केले अर्ज दाखल

पडताळणीत चार भावांचे अर्ज केले बाद

0

गणेश दळवी आष्टी-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आष्टी तालुक्यातून सुमारे 55 हजार बहिणींनी अर्ज दाखल केले असुन,यातील 36 हजार 130 बहिणींच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत.आणि या लाडकी बहीण योजनेत चार भावांनीही अर्ज दाखल केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सदरील चार लाडक्या भावांचा अर्ज बाद करण्यात आले असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिली आहे.

ऑनलाईन पडताळणीत आलेला अर्ज

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली.जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये हप्ताही बहिणींच्या खात्यावर जमा केला.आष्टी तालुक्यात सुरुवातीच्या नारि ॲपद्वारे एकूण 36 हजार 639 अर्ज जमा झाले.यातील 36,130 बहिणींच्या खात्यावर प्रत्येकी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले.तर एसबीवाय ॲपद्वारे आज दिनांक 26 ऑगस्ट पर्यंत 19 हजार 65 अर्ज दाखल झाले असून,या लाडकी बहिण योजनेसाठी तालुक्यातील एकूण 55 हजार 704 सोबत चार लाडक्या भावांनीही आपले अर्ज या द्वारे अपलोड केले.ही बाब अर्ज पडताळणी करताना उघडकीस आली असता अर्ज बात करण्यात आले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे पहिल्या टप्प्यातील रक्कम बँक खात्यात वर्ग झाले आहे.

या योजनेसाठी अद्यापही अर्ज दाखल न केलेल्या बहिणींसाठी पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा सुरू आहे.तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका हे काम बजावत आहेत.जे कोणी अर्ज दाखल करण्याचे राहिले असतील त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकाकडे अर्ज दाखल करून घ्यावा तसेच याकामी सुपरवायझर ए.बी.ससाणे,व्ही.जे.कारंजकर, एस.के.जाधव,मोनिका कार्ले,एम.एस.वांढरे,एस.आगाशे,पी.एस.क्षिरसागर,ए.एस.राठोड,प्रतिक्षा व्यवहारे हे आप-आपल्या केंद्रात डोअर ते डोअर जाऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस मार्फत अर्ज भरून घेत असल्याची माहिती अंजली वाघमारे यांनी दिली.
आत्तापर्यंत तालुक्यातून 55 हजार अर्ज दाखल
आष्टी तालुक्यात नारी शक्ती ॲप द्वारे 36 हजार 639 हे एकूण अर्ज प्राप्त झाले असून,यापैकी 36 हजार 130 लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे वर्ग झाले आहेत.तर एसबीवाय ॲपद्वारे आत्तापर्यंत (दि.26) 19 हजार 65 अर्ज दाखल झाले असून यातील 17811 अर्ज मंजूर झाले आहेत.यातील 1070 अर्ज त्रुटीसाठी ऑनलाईन पाठवले असून 64 अर्ज बाद झाले आहेत.तसेच या एकूण 55 हजार 704 अर्जामध्ये चार लाडक्या भावांनी अर्ज दाखल केले ते पडताळणीमध्ये बाद करण्यात आले आहेत.
-अंजली वाघमारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आष्टी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.