व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची सांगता;लाखो शेतक-यांच्या भेटीसह,दहा कोटींची उलाढाल

शेतक-यांना प्रदर्शनामुळे शेतीतील नवे प्रयोग आणि नव्या तंत्राची झाली ओळख-माजी आ.धोंडे

0

click2ashti update-गेल्या दोन वर्षांपासून मतदार संघातील शेत-यांना अधुनिक शेतीची माहिती होऊन कमी पाण्यात जास्त उत्पादन व कोणत्या वेळी कोणती पिके घेयची यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय डॉ‌.स्वामीनाथन कृषी प्रदर्शनाची सांगता झाली.या चार दिवसांच्या कृषी प्रदर्शनात बीडसह अहमदनगर,धाराशिव जिल्ह्यातील लाखों शेतक-यांनी लाभ घेत जवळपास १० कोटींची उलाढाल झाली.शेतक-यांना प्रदर्शनामुळे त्यांना शेतीतील नवे प्रयोग आणि नव्या तंत्राची ओळख झाली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केले.

आष्टी-येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शानाच्यावेळी उपस्थित असलेले ह.भ.प.विठ्ठल महाराज यांचा सन्मान करतांना माजी आ.धोंडे दिसत आहेत.

छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आष्टी शहरात राज्यस्तरीय डॉ‌.स्वामीनाथन कृषी प्रदर्शनाची सांगता रविवार (दि.१)रोजी दुपारी ३ वा.संत,महंत च्या उपस्थितीत झाली.यावेळी माजी आ.धोंडे बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज,अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांच्यासह स्वागताध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय धोंडे,राजेश धोंडे, अभयराजे धोंडे,विठ्ठल बनसोडे,जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर,उपसभापती पांडुरंग नागरगोजे,जेष्ठ संपादक प्रा.अनंत हंबर्डे,रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,संजय कांकरिया,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना माजी आ.धोंडे म्हणाले,सहा एकरांहून जास्त जागेवर आयोजित या प्रदर्शनामध्ये देश-परदेशातील तीसपेक्षा अधिक पिकांचे प्रत्यक्ष लागवड प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना पाहायला मिळाले. यानिमित्ताने विकसित केलेली,भरघोस उत्पादन देणारी विविध पिके,नवनवीन संकरित वाण,भाजीपाला,फुलवर्गीय पिके यांची माहिती शेतकर्‍यांना मिळाली.या प्रदर्शनात ठिबक सिंचन,तुषार सिंचन,धान्य निवडक यंत्रे,अत्याधुनिक कृषी अवजारे,मल्चिंग पेपर,शेडनेट, पाईप यासह खते, बी- बियाणे,कीटकनाशके,बुरशीनाशके,सेंद्रिय उत्पादने,सोलर पंप,मोटार पंप यांचे स्टॉल्स असल्याने आणि ट्रॅक्टर-अवजारे यांची प्रात्यक्षिके पाहता आली.यासह मत्स्यपालन, कुक्कुटपालन,हॅचरीजपासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत सर्व ती माहिती त्यांना मिळाली.प्रदर्शनातील विविध कंपन्यांच्या स्टॉल्सभोवती शेतकर्‍यांची शेवटपर्यंत गर्दी होती.या चार दिवसांच्या कृषी प्रदर्शनात १ लाख ३ हजार शेतकऱ्यांनी भेटी दिल्या असून,जवळपास १० कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महंत विठ्ठल महाराज म्हणाले,वारकरी संप्रदायाचे मूळ अधिष्ठान श्रीक्षेत्र गहिनीनाथगड आणि संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद धोंडेंच्या पाठीशी कायम राहील त्यांचे कार्य महान असून युवक शेतकरी बेरोजगार वारकरी यांच्या सदैव सोबत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे.

आष्टी-येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात उपस्थित शेतकरी दिसत आहेत.

तर ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी राज्य कृषी प्रदर्शनात विस्तृत विचार मांडले.तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे म्हणाले,या कृषी प्रदर्शनामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली असून,प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडली.त्यांना नवनवीन माहिती मिळाली.यातून शेतकरी समृद्ध होण्यासाठी मदत होईल व ‌माजी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रत्येक वर्षी अशाच चांगल्या प्रकारचे कृषी प्रदर्शन आयोजित करावे अशी अपेक्षा हि त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे व प्राचार्य बाळासाहेब साखेमकर यांनी करत उपस्थितांचे आभार प्रा.पी.आर.काळे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.