मुस्लिमांना मशिदीत घुसून,’चुन चुन के मारेल’;आमदार नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान
AIMIM चा आरोप- भाजपला जातीय हिंसाचार हवा आहे
click2ashti update-धर्मगुरू रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रविवारी (1 सप्टेंबर) अहमदनगरमध्ये सकल हिंदी समाज आंदोलन झाले. त्यात भाजप आमदार नीतेश राणे यांनी मुस्लिमांना मशिदीत घुसून मारण्याची जाहीर धमकी दिली. ते म्हणाले – महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल कुणी काही बोलले, तर त्यांना थेट मशिदीत घुसून ‘चुन चुन के’ मारले जाईल.
नीतेश राणे यांच्या या भाषणाचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियात व्हायरल झाला.त्यानंतर अहमदनगर पोलिसांनी मंगळवारी श्रीरामपूर आणि तोफखाना पोलिस ठाण्यात 2 एफआयआर नोंदवले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.मुख्यमंत्री साहेब हा दंगलखोर कोण आहे? तुम्ही म्हणता विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, मग हे आमदार कोण आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाला घुसून मारण्याची भाषा करत आहे? राज्याचा गृहविभाग कुठे आहे? गृहमंत्री गप्प का? कोणती कारवाई का नाही? तुम्ही कारवाई करणार नाही,करूच शकत नाही.कारण अशा दंगलखोरांना गुंडांना सोबत घेऊन तुम्हाला दंगल घडवायची आहे.सत्तेसाठी तुम्ही महाराष्ट्र जाळायला निघाले आहात. हे पाप तुमचे आहे. कारवाई करा, तुम्हाला महाराष्ट्राचे भले व्हावे असे वाटत असेल,तर या चिथावणीखोर आमदारावर कारवाई करा, असे विजय वडेट्टीवार सरकावर तोफ डागत म्हणाले.
नीतेश राणे यांचे प्रक्षोभक विधान
नीतेश राणे भाषणात म्हणाले ‘आमच्या रामगिरी महाराजांविषयी… (अपशब्द वापरत). मी तुम्हाला समजेल त्याच भाषेत धमकी देत आहे. तुम्ही आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात काहीही केले तर तुमच्या मशिदीत शिरून तुम्हाला मारले जाईल. एवढे याद राखा.”
AIMIM चा आरोप- भाजपला जातीय हिंसाचार हवा आहे
एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी नितीश राणेंचा व्हिडिओ शेअर करत भाजपची निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार घडवण्याची इच्छा असल्याचा आरोप केला. नितीश राणेंचे भाषण प्रक्षोभक आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.