व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पोलिस होण्याचे तिचे स्वप्न भंगले;आष्टीच्या तरूणीचे पुण्यात अपघाती निधन

0

गणेश दळवी आष्टी-प्रत्येक महाविद्यालयीन तरूण पोलीस व सैन्यात भरती होण्याचे स्वप्न नेहमी उराशी बाळगत असतो पण काहीचे स्वप्न पूर्ण होत नाही तोच ते स्वप्न तुटत असते.अशीच एक धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील रुटी येथील आरती पांडुरंग नागरे (वय १९) तरुणी पुणे येथे पोलिस भरतीची लेखी परिक्षा देण्यासाठी गेली असता अपघाती निधन झाले.

चंदननगर पुणे येथील अपघातातील डंम्पर दिसत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,आष्टी तालुक्यातील रूटी येथील आरती नागरे हीने पुणे पोलिस भरतीसाठी अर्ज दाखल केला होता.या पोलीस भरतीसाठी आरतीने खुप मेहनत घेत ५० गुणांपैकी ४७ गुण मिळविले होते.आज बुधवार (दि.४)रोजी तिचा पुणे येथे लेखी पेपर असल्याने ती सोमवारी (दि.२)रोजी पुणे येथे आपल्या भावाकडे गेली होती.ती मंगळवारी दुपारी दिडच्या दरम्यान पुणे येथील चंदननगर रस्त्यावरुन स्कुटी वरुन जात असतांना शिवाजी तानाजी मुरकुटे (रा.लोणीकंद) हा नगर रस्त्यावर वाघोलीवरून पुण्याच्या दिशेने डम्परमधून खडी घेऊन निघाला होता.दर्गा परिसरात आल्यावर त्याचे डम्परवरील नियंत्रण सुटले व त्याने समोरील दुचाकीला पाठीमागून धडक दिली.त्यामुळे दुचाकी चालविणारी तरुणी आरती पांडुरंग नागरे (रा.तुळजा भवानीनगर,मूळ -रुटी,ता.आष्टी,जि.बीड) हिचा जागीच मृत्यू झाला.चालक घटनास्थळावरून पळून गेला.याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये सागर पांडुरंग नागरे यांनी फिर्याद दिली.तपास विमानतळ पोलिस ठाण्याचे अजय संकेश्वरी व एस.एस.चौधरी करीत आहेत.बुधवारी पहाटे‎ आरतीवर राहत्या मुळ रूटी यागावी अंत्यसंस्कार करण्यात‎ आले.आरतीच्या पश्चात‎ आई,वडील,दोन भाऊ,आजी,‎आजोबा असा परिवार आहे.‎
आरतीचे स्वप्न भंगले…
अपार कष्ट आणि मेहनतीच्या बळावर एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून आरतीने नाव कमावले अवघ्या १९ वर्षाच्या आरतीने दोन वेळा महाराष्ट्राच्या कुमार संघाचे नेतृत्व केले,तसेच खेलो इंडियामध्ये महाष्ट्राच्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.उराशी पोलीस भरतीचे स्वप्न बाळगून ती पुणे येथे गेली होती. आरतीने पोलीस भरतीसाठी खुप मेहनत घेतली होती.
आज नियतीने आरतीचे पोलिस होण्याचे स्वप्न भंगले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे‌.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.