व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तहसिलदार पदाचा वैशाली नेमगोंडा पाटील यांनी पदभार स्विकारला

अधिकारी-करमचारी यांनी केले स्वागत

0

click2ashti update-गेल्या दिड महिन्यापासून आष्टी तहसीलदार पद हे रिक्त असल्याने अनेक जणांची कामे खोळंबली होती.आज शुक्रवार (दि.६) रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथील वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी तहसीलदार चा पदभार स्वीकारला आहे.

आष्टी-तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारलानंतर तहसिलदार पाटील यांचे स्वागत करतांना आष्टी तहसिलचे अव्वल कारकून भगिरथ धारक,राजाराम पवार, ज्ञानेश्वर सोनटक्के दिसत आहेत.

येथील तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्ती मिळालेल्या तहसीलदार वैशाली नेमगोंडा गेल्या दिड महिन्यांपासून रुजू न झाल्याने आष्टी तहसीलदारांचे पद रिक्त होते.यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून प्रचंड गैरसोय होत होती.आज शुक्रवार (दि.६)रोजी दुपारी ३ वा.नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.येणा-या काळात त्यांच्यासमोर विधानसभा,अवैध वाळू वाहतूक,गौण खनिज यासह आदि आवाहने आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.