रविवारी,सोमवारी शहरातील मांसविक्री बंद-नगराध्यक्ष जिया बेग
click2ashti update-आष्टी-जैन धर्मीय पवित्र पावन पर्वधीराज पर्युषण पर्व दि.08/09/2024 ते दि. 09/09/2024 काळात मास,मच्छी,मटन दुकाने बंद चे आवाहन आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष जिया बेग म्हणाले, माजीमंत्री सुरेश धस यांच्या सुचनेने व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जैन धर्मीय पवित्र पावन पर्वधीराज पर्युषण पर्व दि. 08/09/2024 ते दि.09/09/2024 काळात मास,मच्छी, मटन दुकाने बंद करणे बाबत मा.अप्पर जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे पत्र क्र.2024/आरबी-डेस्क-1/पोल-1/निवेदन/कावी- दि.06/09/2024 कळविलेले आहे.तरी आपले दुकान आज रविवार दि.08/09/2024 व सोमवार दि. 09/09/2024 या काळात बंद ठेवून नगर पंचायत वशासनास सहकार्य करावे असे आवाहन आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी केले आहे.