click2ashti update-घरात होणाऱ्या रोजच्या
भांडणाला वैतागून ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.रेखा ज्ञानेश्वर डुकरे (रा.आष्टी) असे मृत महिलेचे नाव आहे.

आष्टी येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या रेखा यांचे पती ज्ञानेश्वर यांच्यासोबत दररोज घरगुती कारणावरून भांडण होत असत. भांडणाला कंटाळून रेखा यांनी रविवारी सकाळी सातच्या सुमारास घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.सहा तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले असून,आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशीरा मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.