अश्लील ग्रुप मध्ये विनयभंग केल्याचा कॉल करून उकळले जातात पैसे
click2ashti update-अगोदर ग्रुप मध्ये समाविष्ट करून या ग्रुपवर फक्त अश्लील मेसेज पाठवून त्यातील प्रत्येक व्यक्तीला कॉल करत तुम्ही या ग्रुप मध्ये सामील झाला तुम्ही मेसेज कशाला पाहिले.म्हणून तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल जर प्रकरण मिटवायचा असेल तर काही ठरलेले रक्कम ऑनलाईन करा नसता तुमच्या घरी चार्जशीट पाठवू असा कॉल करत आम्ही कोल्हापुर जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस स्टेशन मधून बोलत असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे आष्टी तालुक्यात समोर आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,सुरुवातीला अश्लील ग्रुप काढत या ग्रुप मध्ये नागरिकांना समाविष्ट करून घेतले जाते.त्यानंतर त्यातून प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक कॉल केला जातो.या कॉलवरून तुम्ही या या ग्रुप मध्ये समाविष्ट आहात का? या ग्रुपमधून तुम्ही व्हिडिओ पाहतात का?पाहिले तर तुम्ही पाहिचे कशाला या ग्रुपमध्ये राहायचं कशाला असं बोलून तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.जर हे प्रकरण मिटवायचं असेल तर अमुक अमुक पैसे ऑनलाइन टाका नसता तुमच्या घरी चार्जशीट येईल.असा कॉल आज गुरुवारी सकाळी ११ वा.आष्टी शहरातील एका नागरिकाला 7448245654 या क्रमांकावरून आला व मी कोल्हापूर येथील गांधीनगर पोलीस स्टेशन वरून बोलत असल्याचे सांगत,आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करत आहोत असे सांगितले.त्यामुळे घाबरलेल्या व्यक्तीने पत्रकाराकडे धाव घेतली.संबंधित फोन केलेल्या व्यक्तीला फोन लावला असता त्याने फोन कट करत स्विच ऑफ केला.वारंवार कॉल करूनही फोन उघडला नाही.जर असेच प्रकरण घडत सर्वसामान्य लोकांना घाबरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा सर्रास प्रकार चालू आहे.त्यामुळे सायबर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.तर या भुरट्या पोलिसांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांतन मागणी होत आहे.