बांदखेल येथे माजी मंत्री सुरेश धस यांचे गणेशोत्सवानिमित्त जंगी स्वागत
click2ashti update-आष्टी तालुक्यातील बांदखेल येथे जोगेश्वरी तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आरतीसाठी बुधवार (दि.११)रोजी रात्री आठ वाजता माजीमंत्री सुरेश धस यांनी उपस्थित राहत कार्यक्रमाला हजेरी लावली.यावेळी सुरेश धस यांची जोगेश्वरी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गावात भव्यदिव्य ढोल,ताशा,डी.जे.जेसीबीने फुलांची उधळण करत जल्लोषात मिरवणूक काढत जंगी स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तरुण मंडळी, महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धस म्हणाले,
गणरायाच्या या उत्सवातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्या आजच्या तरूणाईने घेणे आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त केले. बांदखेल गावाने माझ्यावर पहिल्यापासून भरभरून प्रेम केलं आणि माझंही बांदखेल गावावरही विशेष लक्ष असते अशी भावना व्यक्त केली.गणेशोत्सवाच्या बदलत चाललेल्या परंपरा,करमणुकीचे साधने, आधुनिक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर होणारा समावेश तसेच त्यासोबत शेतीमाल उत्पन्न बाजार भाव आदीबाबत शेतकरी,नागरिक व तरुणांशी दिलखुलासपणे संवाद साधला.यावेळी जोगेश्वरी तरुण मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी प्रसाद स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात होती.या कार्यक्रमास,पोपट पुंडे,भास्कर थोरात, कल्याण परभणे,पंढरीनाथ थोरात,दत्ता वाळके,पोपट मेजर आवटे मेजर,अशोक पाटील,डॉ.आजिनाथ परभणे,महादेव पुंडे,शिवाजी थोरात,दादा परभणे,दिनकर पाटील,अशोक मुळे,संपत वाळके, विनायक उमाप,श्रीकांत पोटदुखे,पोपट कारभळ,अभिमन्यू परभणे, मुकेश परभणे,सुधाकर कारभळ,जयसिंग परभणे आदींसह जोगेश्वरी तरुण मंडळाच्या सदस्यानी अथक परिश्रम घेतले.