महेश अशोकराव जोशी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
click2ashti update-येथील रहिवासी असलेले महेश अशोकराव जोशी यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.सध्या ते अहिल्यानगर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात “पैरवी अधिकारी” म्हणून ते काम करत आहेत.
महेश अशोकराव जोशी हे आष्टी येथील ग्राम उपाध्ये असलेल्या वेदशास्त्रसंपन्न अशोक माधवराव जोशी यांचे चिरंजीव असून त्यांचे प्राथमिक शिक्षण आष्टी येथे जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला आणि महाविद्यालयीन शिक्षण हंबर्डे महाविद्यालय येथे झाले.शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी कबड्डी या खेळामध्ये राज्यस्तरावर अनेक स्पर्धांमध्ये यश प्राप्त केल्यामुळे त्यांची खेळाडू या प्रवर्गातून १९९१ साली अहमदनगर पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर निवड झाली.नियुक्तीच्या सुरुवातीला अहमदनगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन,त्यानंतर जामखेड पोलीस स्टेशन,कर्जत पोलीस स्टेशन,पाथर्डी पोलीस स्टेशन,त्याचबरोबर मुख्यालयीन दंगल नियंत्रण पथक अशा विविध ठिकाणी काम केले ३४ वर्षाच्या या संपूर्ण सेवा कालामध्ये त्यांनी पोलीस विभागाचे ब्रीदवाक्य असलेले
“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद जपत आपल्या वागणुकीतून सर्वसामान्य जनता,सहकारी पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी अत्यंत उत्तम समन्वय घडवून आपली सेवा जनतेच्या चरणी अर्पण केली आहे.पोलीस विभागाच्या अत्यंत धकाधकीच्या आणि सततच्या धावपळीच्या असलेल्या या सेवेमध्ये त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वतःला घडविले आहे.ते या कालावधीमध्ये कोणत्याही व्यसनाधीनतेकडे अथवा मोहपाशाकडे वळाले नाहीत त्यांनी अत्यंत निस्वार्थीपणे, कर्तव्यदक्षतेने कायद्याचे महत्त्व जनतेला पटवून देत सेवा केलेली आहे. आपल्या सेवेचा उर्वरित काल देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करता यासाठी यासाठी ते काळजी घेत असतात त्यांच्या या सर्व समावेशक सर्वांना समजून घेण्याच्या संयमी स्वभाव आणि अभ्यासू भूमिकेमुळे ते सर्वत्र लोकप्रिय आहेत.