“एक सण-एक वृक्ष,आणि”एक पेड माँ के नाम” या उपक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मुख्याधिकारी ऋतुजा पाटील
नगराध्यक्ष जिया बेग आणि मुख्याधिकारी ऋतुजा पाटील यांचे आवाहन
click2ashti update-माझी वसुंधरा अभियान आणि”स्वच्छता हीच सेवा” 2024 या अभियाना अंतर्गत श्रीगणेशोत्सव आणि ईद-ए -मिलाद या पवित्र कालावधीतील पर्वा वर आष्टी नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने आष्टी शहरांमध्ये स्वच्छता हीच सेवा,एक सण-एक वृक्ष आणि एक पेड माँ के नाम हे उपक्रम सुरू करण्यात आले असून,आष्टी शहरातील पर्यावरण संवर्धन करून आष्टीतील नागरिकांचे जीवन अधिक सुंदर बनवण्यासाठी या उपक्रमामध्ये आष्टी शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आष्टी नगरपंचायत चे नगराध्यक्ष जिया बेग आणि नव्याने पदभार स्वीकारलेल्या मुख्य अधिकारी ऋतुजा पाटील यांनी केले आहे.
आष्टी नगरपंचायत प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी याबाबत माहिती दिली याबाबत अधिक माहिती देताना मुख्य अधिकारी ऋतुजा पाटील म्हणाल्या की आष्टी नगरपंचायत च्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येणार आहे दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी नगराध्यक्ष जिया बेग आणि आपल्या वतीने आष्टी शहरातील पेठ गणेश मंडळासह पाच प्रतिनिधिक स्वरूपामध्ये गणेश मंडळांना प्रत्येकी पाच वृक्ष लागवडीसाठी सप्रेम भेट देण्यात आले असून या गणेश मंडळांनी त्याची संवर्धन करावे अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर एक सण एक झाड आणि एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या धार्मिक परवावर प्रत्येक घरी वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.शहरातील पर्यावरण समतोल राहण्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आनंददायी जीवन जगता यावे यासाठी उपक्रम आयोजित करण्यात आला असून आष्टीकर नागरिकांनी जास्तीत जास्त या अभियानामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी असा आमचा प्रयत्न असे आहे असे मुख्याधिकारी यांनी सांगत त्यापुढे म्हणाले की, 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत देखील आष्टी शहरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा आमच्या संकल्प आहे. नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी रोपांचा पुरवठा नगरपंचायत कार्यालयाद्वारे करण्यात येणार आहे. मागणीप्रमाणे त्यांना रोपे पुरवण्यात येतील असे सांगत या उपक्रमामध्ये सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.यावेळी नगराध्यक्ष जिया बेग उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,गटनेते किशोर झरेकर कार्यालयीन अधीक्षक प्रकाश हारकळ नगर अभियंता अथहर बेग,नगर अभियंता गहिनीनाथ शिरसाठ,शशांक मिसाळ,नागेश करांडे,दिलीप निकाळजे,संजय निकाळजे,गणेश कुलकर्णी,सोमनाथ साखरे,श्रीकांत भोज,श्रीकांत धोंडे,बाळू धोंडे हे उपस्थित होते.