जि.प.माध्यमिक आष्टा ह.ना.शाळेतील स्काऊट गाईड पथकाने हरिनारायण स्वामी मंदिराची केली स्वच्छता
click2ashti update-जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण येथे कार्यरत असलेले स्काउट मास्टर तथा जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट बापू शिंदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काउट गाईड पथकाने आष्टा गावातील ऐतिहासिक पुराणकालीन हरिनारायण स्वामी मंदिराची स्काऊट व गाईड पथकातील सदस्यांच्या मदतीने मंदिराची साफसफाई केली.
आष्टा शाळेत छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट गाईड पथक कार्यरत असून,पथक प्रमूख स्काऊट मास्टर बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप केंद्र प्रमूख धर्मराज शिंदे,सोमनाथ वाळके व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुराण काळातील ऐतिहासिक वास्तु असलेल्या हरिनारायण स्वामी मंदिराची स्काउटआणि गाईड पथकातील सदस्यांनी मंदिराची स्वच्छता करून साफसफाई केली.या उपक्रमामुळे स्काऊट गाईड पथकाचे स्काऊट बीड जिल्हा संघटक योगेश अवढाळ यांनी कौतुक केले.